राजकिय

ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यात पहिला ठराव मंजूर

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने केला मंजूर

संपादक – दिनेश खंडेलवाल 

ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यात पहिला ठराव मंजूर

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने केला मंजूर

पंढरपूर(प्रतिनिधी):- नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर राज्यांमध्ये चालू असलेल्या ईव्हीएम मशीनच्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह दिसत असून याबाबत अनेक ठिकाणी विरोध दर्शवित तक्रारी सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत ईव्हीएम बाबत पहिला विरोध झाला मात्र पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्यांकडून बैठकीत ईव्हीएम समर्थनार्थ बहुमताने ठराव मंजूर झाल्याने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत राज्यातील ईव्हीएम समर्थनार्थ पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबतचा ठराव ग्रामपंचायत सदस्यांसमोर मांडण्यात आला होता. या ठरावाला १७ सदस्यांपैकी उपस्थित असलेल्या १३ सदस्यांनी हात उंचावून सहमती दर्शवल्याने बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडागळे व सरपंच संजय साठे यांनी दिली.

याबाबत सरपंच संजय साठे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ईव्हीएमने मतदान घेतले जात असल्याने गोरगरीब वंचित सर्वसामान्य जनतेला आपला मतदानाचा हक्क बजावत येत आहे. मात्र काही लोक ईव्हीएमला विरोध करत आहेत. मागील काळात मतपत्रिकेवर मतदान होत असताना काही ठिकाणी मत पेट्या गायब करणे, मतदान केंद्राचा ताबा घेऊन सर्वसामान्य मतदारांचा हक्क हिरावून घेण्याच्या घटना घडत होत्या. मात्र सध्या ईव्हीएमद्वारे मतदान होत असल्याने सर्वसामान्य जनतेला निर्भयपणे हक्काचे मतदान करता येत आहे. ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड होत नाही. असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील काळातही ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी. यासाठी हा ईव्हीएम समर्थणार्थ मतदाना बाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले.

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणुकीत पणे माहिती दिली होती ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही, त्यामध्ये कोणताही डिवाइस नाही, ब्लूटूथ चालत नाही, प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधींचे नेमलेले प्रतिनिधी यांच्यासमोर सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली यामध्ये प्रशासनाने योग्य व सुंदरपणे पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. मतदान जास्त झालं किंवा ईव्हीएम हॅक करता येते हे सर्व खोटं आहे. टेक्निकल यंत्रणेला नॉन टेक्निकल लोकांनी चॅलेंज करू नये, त्यांनी प्रूफ करून दाखवावं आम्ही सुद्धा पुन्हा एकदा ठराव घेऊ असेही सरपंच संजय साठे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अनेक आमदार निवडून आले त्या ठिकाणी गडबड झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमला विरोध करणाऱ्यां बाबत आश्चर्य व्यक्त केले.

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत मध्ये ईव्हीएम समर्थनार्थ ठरावा दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सरपंच संजय साठे व भाजपचे उपसरपंचत सागर सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, नंदकुमार वाघमारे, नागरबाई साठे,आशाबाई देवकते, रेश्मा साठे, रोहिणी साठे, माजी उपसरपंच महादेव पवार, माजी सरपंच विजयमाला वाळके, समाधान देठे,सुरेखा खपाले, शीतल कांबळे, रुक्मिणी जाधव, गोवर्धन देठे ग्रामसेवक जयंत कुमार खंडागळे व कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close