पंढरपुरात भरदिवसा एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपुरात भरदिवसा एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले
पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये प्रदक्षिणा मार्गावरील काळा मारुती परिसरात एक इसमावर चार जणांनी भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला करून हल्लेखोर प्रसार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संभाजीचौक परिसरात राहणाऱ्या दिनेश धोंडीबा देवमारे हा काळामारुती परिसरातून जात असताना संशयीत आरोपी वैभव कांबळे राहणार शेगाव दुमाला यांने तीन साथीदारांसह दिनेश देवमारे यांच्या हातावर, छातीवर, डोक्यावर, कोयत्याने हल्ला करत जबर मारहाण करून जखमी केले आहे.
अनपैक्षित पणे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जखमी देवमारेला तातडीचे उपचारासाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी जखमी देवमारे यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल येथे पाठवण्यात आले आहे.
जखमी झालेला दिनेश देवमारे हा चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन मंदिरात मॅनेजर म्हणून काम करत आहे. त्याच इस्कॉन मंदिरात वैभव कांबळे यांने दिनेश देवमारे यांना मला इस्कॉन मंदिरात कामावर घ्या असे म्हणत होता. परंतु तुला कामावर घेणे माझ्या हातात नाही तू इस्कॉनच्या जबाबदार किंवा संबंधित व्यक्तींना याबाबत विचार असे सांगितले असता याच बोलण्याचा राग वैभव कांबळे यांनी मनात धरून आपल्या तीन साथीदारांसह दिनेश देवमारे याच्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचे समजते.
पंढरपूर शहर पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या देवमारे यांच्याकडे विचारपूस करून माहिती घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.