पंढरीत देवशयनी एकादशी निमित्त श्री सर्वजन हितैषी ट्रस्ट यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फाराळ वाटप
साबुदाणा खिचडी,केळी,राजगिरा लाडू,पिण्याचे शुद्ध पाणी वाटप करण्यात आले
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक येत असतात अशा भाविक वारकऱ्यांना कोलकत्ता येथील श्री सर्वजण हितेशी ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येते. जगद्गुरु रामानुजाचार्य श्री झालरिया पिठाधिपती श्री श्री 1008 श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून गेल्या पाच ते सात वर्षांपासून पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आषाढी यात्रेतील हजारो भाविकांना वारकऱ्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येत असते.
याचे आयोजन लक्ष्मण बागेतील व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यंदाही मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, केळी, आग्राचे पेठे तसेच शुद्ध पिण्याची बाटली असे संपूर्ण फराळाचे वाटप करण्यात येते या वाटपाचे नियोजन व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यावर्षी वाटप करण्यासाठी राजस्थानी येथील रिटायर पोलीस अधिकारी श्री व सौ गोड तसेच नागपूर येथील ओमप्रकाश सरवदे यांनी सहकार्य केले तर सदर फराळ वाटपा मध्ये जगदीश टाक,धनराज पुरोहित,प्रमोद शेंडे,प्रताप परिहार,मोहन भोईर,दिनेश खंडेलवाल यांचे मोलाचे योगदान लाभले.
देवशयनी एकादशी निमित्त यंदाही आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या महिला,पुरुष व जेष्ठ वारकरी भाविकांना फराळ वाटप केल्यानंतर त्यांनी श्री सर्वजण हितैषी ट्रस्टचे मनापासून आभार मानले तसेच फराळ वाटप करताना राम कृष्ण हरी,जय हरीच्या गजरात वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले.