पंढरीत प्रथमच मोफत त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन;रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद
प्रदूषणामुळे त्वचा संबंधित आजारांचे प्रमाणात होतेय मोठी वाढ
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत प्रथमच मोफत त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन;रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद
प्रदूषणामुळे त्वचा संबंधित आजारांचे प्रमाणात होतेय मोठी वाढ
पंढरपूर : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाढलेल्या प्रदूषणाने प्रत्येक नागरिकांना त्वचे विषयी विविध आजार उद्भवत आहेत. अनेकांना तर केसापासून पायाच्या नाखापर्यंत विविध समस्या उद्भवत असल्याने याचा सारासार विचार करून पंढरपुरात प्रथमच मोफत त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन डॉक्टर अंकिता शहा फडे व डॉक्टर राजेश फडे यांनी केले होते.
येथील फडे नर्सिंग होम येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोफत त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला त्वचा रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात जवळजवळ ३७० हून अधिक रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन चंदुकाका सराफ ज्वेलर्स चे अतुल जिनदत्त शहा,सौ. संगीता अतुल शहा,डॉ. विजय फडे,विक्रम नाईकनवरे,कमल फडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली.
सध्या प्रदूषणामुळे त्वचा संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आजारा विषयी जनजागृती होणे आवश्यक व गरजेचे असल्याने पुणे येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.अंकिता शहा फडे यांनी सांगितले.
या शिबिराला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, धाराशिव साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अमरजित पाटील,युवा नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष दगडूआण्णा धोत्रे,डॉ अरूण मेणकुदळे,विनोद लटके, दत्तात्रय धोत्रे,अक्षय वाडकर यांच्यासह विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
या शिबिरात पांढरे डाग,केस गळती,कोंडा, मुरम /पिंपल्स,सुरकुत्या तसेच त्वचेच्या विविध आजारांवर उपचार व मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सिध्दार्थ शहा पुणे, डॉ.राजेश फडे,डॉ.सपना फडे यांनी प्रयत्न केले.