…….त्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आधार देत माणसातील देवाने दिला मदतीचा हात
अनिल सावंत यांनी गोणेवाडी येथील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना आधार देत केली आर्थिक मदत...
संपादक – दिनेश खंडेलवाल
…….त्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आधार देत माणसातील देवाने दिला मदतीचा हात
अनिल सावंत यांनी गोणेवाडी येथील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना आधार देत केली आर्थिक मदत…
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार तथा भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत माणसातील या देवाने आधार देत आर्थिक मदत करुन माणूसकीचे दर्शन घडवले.
नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथे देवीची ज्योत आणायला गेलेल्या गोणेवाडी येथील देवीचे भक्त मंगळवेढा नजीक येताच त्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला होता. यामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. सदरचा अपघात मागील आठवड्यात झाला होता.
या घटनेने गोणेवाडी गावावरच नाहीतर संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली होती. प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे या दोन युवकांचा त्या अपघातात मृत्यू झाला होता.
माणसातील देव म्हणून ओळखले जाणारे अनिल सावंत यांनी मृत पावलेल्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेत त्यांना आधार दिला तसेच आर्थिक मदतही केली.
अनिल सावंत हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून अनेकांच्या दुःखात सहभागी होताना आजपर्यंत दिसले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी आर्थिक मदतही केली आहे. अपघातातील दोन्ही कुटुंबीयांना केलेली आर्थिक मदत ही फार मोठी आधाराची बाजू असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.