पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर ७ दिवसासाठी बंद
माघवारीच्या तयारी करिता मंदिर होतय सज्ज; भक्तांना दर्शनासाठी मनाई
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर ७ दिवसासाठी बंद
माघवारीच्या तयारी करिता मंदिर होतय सज्ज; भक्तांना दर्शनासाठी मनाई
पंढरपूर : पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर सांगोला रोड पंढरपूर हे ता.१५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत अंतर्गत साफसफाई व येणाऱ्या माघ वारीकरिता व्यवस्थापन करण्यासाठी सात दिवस बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती समितीचे सचिव दिलीप भोयर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
येत्या माघवारी करिता राज्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असून यातील हजारो भाविक हे ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिरात वास्तव्यास येत असतात व काही भागातील वारकरी देखील येथे आपला तळ ठोकून असतात त्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर व मंदिर परिसर हे स्वच्छ असणे व येणाऱ्या भाविकांचे उचित नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे.
या करिता ता. १५ ते २२ जानेवारी २०२३ पर्यंत असे सात दिवस मंदिरातील खोल्यांची, साफसफाई, स्वच्छतागृहाची साफसफाई, मंदिर पसरीसारतील साफसफाई, तसेच इतर नियोजन करण्याकरिता एक आठवडा मंदिर बंद करण्यात येत असुन कोणालाही साफसफाई होई पर्यंत मंदिरात व मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी तसेच कोणत्याही भक्तांनी व इतर नागरिकांनी या कालावधीत मंदिरात प्रवेशाकरिता जाऊ नये. असे आवाहन ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर भु – वौकुंठ समिती पंढरपूर चे अध्यक्ष जनार्दन देठे ( गुरुजी) कार्याध्यक्ष रघुनाथ माचेवाड,संचालक सेवकराम मिलमिले, सचिव दिलीप भोयर, यांनी केले आहे.