पंढरपूर पोलिसांनी अवैध गुटखा घेऊन जाणारा मालट्रक पकडला;४४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : कर्नाटक राज्यातून पंढरपूर मार्गे इतर जिल्ह्यामध्ये जाणारा अवैध गुटख्याचा मालट्रक पोलिसांनी शिताफिने पकडला पंढरपूर शहरातून टेंभुर्णी मार्गे जात असलेला हा अवैध गुटख्याने भरलेला मालट्रकचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपासणीसाठी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने विक्रीसाठी बंदी घातलेला व वाहतुकीसाठी बंदी असलेला गुटखा मालट्रकसह पकडल्याने पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कौतुक केले जात आहे.
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की एक लाल रंगाच्या मालवाहतुक ट्रकमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा पंढरपुर मार्गे टेंभुर्णीकडे जाणार आहे. सदरची गोपनीय बातमी मिळालेने पंढरपुर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हददीतील अहिल्या पुलाकडे जाणारे रस्त्यावर सापळा रचला. बातमीतील वर्णनाचा मालवाहतुक ट्रक हा रिलायन्स पंपाजवळ आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवुन ट्रक चालकाकडे मालट्रक मधील मालाबाबत विचारणा केली असता ट्रक चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधीत असलेला हिरा पान मसाला व सुगंधित तंबाखु असलेचे सांगीतलेने सदरचा माल ट्रक नं एम. एच- ०९ सी. ए ३६३० व त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटखा तसेच मालट्रक चे चालकास ताब्यात घेवुन सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणेस आणुन अन्न व औषध प्रशासन यांचेशी संपर्क करून पुढील कार्यवाही करत आहे.
जप्त करणेत आलेला मालट्रक व प्रतिबंधीत केलेला गुटखा एकुण मुद्देमाला मध्ये
२७,६०,००० – रु. किंमत अंदाजे असलेला हिरा कंपनीचा पान मसाला १२० पोती तसेच ६,९०,००० – रु. किंमत अंदाजे असलेला रॉयल ७१७ कंपनीची तंबाखु – ३० पोती आणि ताब्यात घेतलेला अशोक लेलंड कंपनीचा ट्रक नं एम.एच- ०९ सी. ए ३६३० त्याची अंदाजे किंमत १०,००,०००- रु असा
एकुण ४४,५०,०००/- किंमतीचा मुददेमाल चालकासह ताब्यात घेतला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम व शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि सी. व्ही केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ ढेरे, पोहेकॉ सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोना सचिन इंगळे, पोना सुनिल बनसोडे, पोना दादा माने, पोना राकेश लोहार, पोना सचिन हॅबाडे, पोना सुजित जाधव, पोकों समाधान माने
यांनी कामगिरी केली आहे.