सामाजिक

षडरिपुंवर मात केलेले महाराष्ट्रातील रामानुजाचार्य – हभप. प्रसाद महाराज अंमळनेरकर

माघ शुद्ध -१० रोजी प्रगट दिनानिमित्त श्री संत सखाराम महाराज अंमळनेरकर संस्थानचे मठाधिपती परमपुजनीय हभप. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना वंदन..!

संपादक – दिनेश खंडेलवाल 

षडरिपुंवर मात केलेले महाराष्ट्रातील रामानुजाचार्य – हभप. प्रसाद महाराज अंमळनेरकर

माघ शुद्ध -१० रोजी प्रगट दिनानिमित्त श्री संत सखाराम महाराज अंमळनेरकर संस्थानचे मठाधिपती परमपुजनीय हभप. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना वंदन..!

पंढरपूर:- सद्गुरू सारखा असता पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ।।
या संत वचना प्रमाणे
आपल्या केवळ दर्शनाने सर्वसमान्यांच्या जिवनात चैतन्य फुलविणाऱ्या अलौकीक व्यक्तीमत्वास आजच्या परिभाषेत संत असे म्हटले जाते, आणि असे अलौकीक व्यक्तीमत्व प्रत्यक्ष सद्‌गुरु म्हणुन आपल्या जिवनामध्ये भेटणे हे म्हणजे आपल्या सारख्या पामराचे परमभाग्यच समजावे लागेल आणि अशा अव्दितीय तेजोमय गुरूचा वरदहस्त लाभणे हे पुर्व पुण्याईनेच केवळ प्राप्त होते असेच म्हणावे लागेल. सद्गुरू श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांचा एक आर्शिवादपर दृष्टीक्षेप आमच्या सारख्या संसाराच्या रहाट गाडग्यात गुतूंण पडलेल्या कच्छपी जीवाच्या दृष्टीने महदभाग्यच होय. रिक्तहस्ते एकाही भक्ताला परत न पाठविणारे संत महात्मे, दातृत्वसंपन्नता व स्थितप्रज्ञतेचा ध्रुव तारा, म्हणजेच प्रसाद महाराज अमळनेरकर हे पंढरपूरकरां बरोबरच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञात आहेत.

सर्वसाधारणपणे महाराज मंडळींना तसेच धार्मिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्तींना लोकांकडून फक्त घ्यायची सवय असते, मात्र द्यायची नसते, त्याला अपवाद असणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे रामानुजाचार्य संत श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर हे होय. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक शिष्य, भक्तांना ज्ञानाबरोबर आत्मिक भाव देवाप्रती श्रद्धा भक्ती चे मौलिक मार्गदर्शन देत असतात पंढरपुरात चातुर्मास कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला दोन वेळेस भोजन दक्षिणा देण्यासाठी सदैव तत्पर असलेले पहावयास मिळते.

ज्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी आपल्या मनामध्ये आनंद लहरी निर्माण होऊन प्रसन्नता प्रगट होते असे व्यक्तिमत्व प्रसाद महाराज अंमळनेरकर हे होय. धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, तसेच आरोग्य क्षेत्रात बहुमोल योगदान असलेले व्यक्तिमत्व म्हणून जे चिरपरिचित आहेत, ते संत हभप प्रसाद महाराज अमळनेरकर हे होत. अनेक संकटे पचवून, आपल्या चेहऱ्यावर संकटांचा कोणताही अविर्भाव न दाखवता, संतपदाला पोहोचलेली महाराष्ट्रातील आधुनिक काळातील एकमेवाद्वितीय व्यक्ती म्हणजे रामानुजाचार्य संत श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर हे होत.

कलियुगात संत पदाला पोहोचलेले महात्मे खूप थोडे आहेत. त्यातच महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व असलेले संत पदाचे कणखर दावेदार हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहेत. दातृत्व संपन्नतेचे सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेले व आपल्याजवळ जे काही आहे ते गुणीजनांना वितरित करणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणून पंढरपूर-अंमळनेर-संभाजीनगर-आळंदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना ओळखले जाते ते परम आदरणीय संत श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर हे होत. बाबांचा आज माघ शुद्ध दशमी हा प्रगट दिन होय.

अंमळनेरकर संस्थांनचा कारभार शतकानुशतके हा तिथीनुसारच चालत आलेला आहे, तिथी ह्या निश्चित असतात, तिथीला निसर्गाचे अधिष्ठान असते, मात्र तारखेला नसते. त्यामुळे अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रांमध्ये बहुमोल सामाजिक योगदान देऊन प्रबोधनाची धुरा सांभाळत असलेल्या अंमळनेरकर संस्थांनमध्ये तिथीनुसारच कारभार केला जातो. हा आदर्श भारत सरकारने घेणे आवश्यक आहे. जर भारत सरकारने प्रशासकीय कारभार, राजव्यवहार तिथीनुसार केला तर भारत देश हा जगामध्ये हिंदुत्ववादी देश म्हणून ओळखायला वेळ लागणार नाही, यात शंका नाही. कारण जगातील १८ प्रमुख धर्मांपैंकी दोनच धर्म (सनातन,हिंदू , मुस्लिम) तिथीनुसार व्यवहार करताना दिसतात.

विश्वमालक श्री पांडुरंगजींवर अपार श्रद्धा असलेले, तसेच त्यांच्या सेवेमध्ये व तपश्चर्येमध्ये लीन असलेले रामानुजाचार्य श्री संत प्रसाद महाराज अंमळनेरकर हे माघ शुद्ध दशमीला पृथ्वीतलावर प्रगट झाले आहेत. महाराजांना पशुपक्ष्यांवर प्रेम असल्याने अश्वांमधील (घोड्यांची माहिती) सर्वंकष आहे. आयुर्वेद, अध्यात्म, धार्मिकता, यासह श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीसह संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील अभंगांवरती गाढा अभ्यास आहे. संतांबद्दल प्रचंड आस्था असल्याने संत विषयाचे गांभीर्य आजमावण्यासाठी आपण लीनतेची कास धरली पाहिजे, असे महाराजांचे मत आहे.

रामानुजाचार्य श्री संत प्रसाद महाराज अंमळनेरकर हे अंमळनेर ते पंढरपूरची वारी पायी करतात, तसेच चार महिने तीर्थराज भुवैकुंठ पंढरी नगरीमध्ये वास्तव्य असते. वर्षातील बाकी ७ महिने समाजप्रबोधनाचे कार्य चालू असते. संस्थानचे अंमळनेर येथे शालेय शिक्षणासह वैदिक धर्म व संस्कृती शिक्षणाचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. संस्थांच्या अनुषंगाने होत असलेल्या महाराजांच्या कार्यामुळे देश-विदेशातील प्रमुख मंडळी महाराजांच्या समोर लीन होत असतात. सर्वसंगपरीत्यागाचा अनुभव घेत असतात.

प्रगटदिनानिमित्त रामानुजाचार्य संत श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर महाराजांच्या कार्याला व तपश्चर्येला सहस्त्रकोटी नमन

-✍️ शारदासुत श्री राधेश पोपट बादले पाटील, पंढरपूर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close