ईतर

पंढरीत वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरणार्या दोन ठिकाणी पुरवठा विभागाची कारवाई

चार गॅस सिलेंडर सह ३१ हजाराचा मुद्देमाल ताब्यात; अवैद्य रित्या गॅस भरणाऱ्यांचे दणाणले धाबे!

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरीत वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरणार्या दोन ठिकाणी पुरवठा विभागाची कारवाई

चार गॅस सिलेंडर सह ३१ हजाराचा मुद्देमाल ताब्यात; अवैद्य रित्या गॅस भरणाऱ्यांचे दणाणले धाबे!

पंढरपूर : पंढरपूर शहर हे अवघ्या महाराष्ट्राचे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते, सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब लक्षात घेवुन आज दिनांक २२/१२/२०२२ रोजी तहसिलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरना होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली.

पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक यांनी नियमित तपासणी अंतर्गत पंढरपूर येथील कळशेनगर,वडर गल्ली,जुना अकलुज रोड लगत असलेल्या गाळ्यामध्ये अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन रिक्षामध्ये गॅस भरत असल्याची माहीती मिळाल्याने तहसिल कार्यालयातील कोतवाल प्रल्हाद खरे व महादेव खिलीरे सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी सुभाष शिवाजी जाधव वय-६४ वर्षे रा.पंढरपूर या इसमास घरगुती वापरातील एकुण ०४ सिलेंडर व टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे दोन इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा (अंदाजे रक्कम २३०००/- रू) या मुदेमालासह रंगेहात पकण्यात आले.

तसेच अंबाबाई पटांगण अंबाबाई देवीच्या समोरच्या बाजुला एक पत्र्याची टपरीमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून गॅस रिक्षामध्ये भरत असुन तेथे अवैधरीत्या गॅस विक्री करत असल्याची माहीती मिळाल्याने तातडीने वरील पंच व पो.हे.कॉ. गणेश शिंदे यांचे सह सदर ठिकाणी पोहोचलो असता एक आज्ञात इसम वर नमुद वर्णनाप्रमाणे २ घरगुती गॅस सिलेंडर टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार असे एकुण ८०००/- रू. चे साहित्य मिळुण आले ती वेळ दुपारी १.३० वा. ची असुन दोन्ही ठिकाणचे सविस्तर वेगवेगळे पंचनामे तयार केले आहेत.

वरील कार्यवाहीच्या अनुषंगाने १) सुभाष शिवाजी जाधव वय – ६४ वर्षे २) अज्ञात व्यक्ती विरूदध जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ च्या कलम ३ व कलम ७ अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे पंढरपूर शहरांमध्ये कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीने अवैधरित्या जर गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरत असल्यास माहिती देण्याचे आवाहन पुरवठा विभागाचे निरीक्षक सदानंद नाईक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close