दिलीप स्वामी यांच्या सहकार्याने अंगणवाडीतील त्या बालिकेची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न;काय होती ती शस्त्रक्रिया पहा
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात मानले आभार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब गावच्या एका अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या अडीच वर्षाच्या इनाया मतीन बागवान या बालिकेची ऐकण्याची क्षमता कमी होती. त्या बालिकेच्या कानाची ‘कोक्लेयर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया करायची होती. मात्र अतिशय महागडी शस्त्रक्रिया व सुमारे सहा लाख खर्च अपेक्षित असल्याने तीच्या पालकांची परिस्थिती पाहता त्यांना शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सदर बालिकेची तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करून त्या बालिकेची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली
दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी त्या बालिकेला शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या मोरया हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले त्या ठिकाणी तीच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
- सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जवळपास १ हजारच्या आसपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात ४४ ह्रदयाच्या शस्त्रक्रियांचा समावेश होता अशी माहिती देण्यात आली.
काय आहे कोक्लेयर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया
आपल्या कानाच्या आतील बाजूस कोचलीया नामक केसांच्या लहान पेशी असतात. या पेशी सामान्यत: बाहेरून येणारे ध्वनी स्पंदने उचलतात आणि श्रवण मज्जातंतूंद्वारे मेंदूत पाठवतात. त्यामुळे कमी ऐकू येणाऱ्या लोकांना आवाज स्पष्ट ऐकू येण्यास मदत होते. कोक्लेयर इम्प्लांट हे एक लहान आणि जटिल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. एका विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ऐकण्याची क्षमता वाढते.