ईतर

पंढरीत महावितरणचा सहाय्यक लेखापाल पाच हजाराची लाच घेताना सापडला

पुणे एसीबीची कारवाई; महावितरणच्या ग्रामीण-२, ऑफिस मध्ये झाला चतुर्भुज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरीत महावितरणचा सहाय्यक लेखापाल पाच हजाराची लाच घेताना सापडला

पुणे एसीबीची कारवाई; महावितरणच्या ग्रामीण-२, ऑफिस मध्ये झाला चतुर्भुज

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कोरोली येथील किराणा दुकानदाराकडे नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी तसेच दंडाचे रक्कम कमी करण्यासाठी म्हणून पंढराहजार रुपये लाचेची मागणी केली असता पाच हजार रुपये लाच घेताना सहाय्यक लेखापाल वर्ग तीन, महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या ठिकाणी कार्यरत असलेले आरोपी लोकसेवक श्रीकांत भिमराव आवाड रा. विडीघरकुल, सोलापूर यास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंढरपूर ग्रामीण-२ च्या कार्यालय आवारात रंगेहात पकडल्याने महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी यातील तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. नमूद दुकानांमध्ये नवीन वीज मीटर घेण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी शेजारच्या दुकानातून लाईट कनेक्शन घेतले म्हणून त्याच्यावर ७०,०००/रू चा दंड आकारलेला आहे असे सांगून तो दंड माफ करण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक श्रीकांत भिमराव आवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस पंधरा हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे कबूल करून, ती लाच रक्कम महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या कार्यालयाच्या आवारात स्वीकारले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या सापळा पथकामध्ये
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पो.शि. रियाज शेख, पो.शि. दिनेश माने,पो. शि मंगेश कांबळे
चालक पो.हवा दिवेकर, ला.प्र.वि. पुणे. यांनी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अमोल तांबे, व अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी ,कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close