
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत वारीसाठी आलेल्या भाविकाचा काणेज् हॉस्पिटलमध्ये वाचवला जीव
शंभर टक्के ब्लॉकेज असल्याने एन्जोप्लास्टी करून वाचवला जीव
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर येथील डॉक्टर काणॆज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नांदेड वरुन तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्याने विचारासाठी दाखल केले असता शंभर टक्के ब्लॉकेज असतानाही डॉक्टरांच्या टीमने अथक परिश्रम करुन रुग्ण भाविकाचा जीव वाचवला.
हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी माणिक संगेकर (वय ७५) हा भाविक नांदेड वरून पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी पंढरीत आला होता. इथे आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी त्वरित डॉक्टर काणेज् सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टर च्या टीमने उपचारास सुरुवात केली असता सदर रुग्णाला शंभर टक्के ब्लॉकेज असल्याचे निदर्शनास आले. यामुळेच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्याने त्याच्यावर त्वरित एन्जोप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर प्रक्रिया आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार करून पेशंटचा जीव वाचवण्यात आला. सदर उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असतानाही बालाजी माणिक संगेकर यांना एक रुपयाही खर्च न करता संपूर्णतः मोफत उपचार या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.
त्यावेळेस सदर पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर काणेज् सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. यासाठी सर्व पंढरपूर मध्ये सर्व डॉक्टर टीमचे कौतुक होता आहे.
उपचाराचा खर्च मोठा असतानाही बालाजी माणिक संगेकर यांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ETI (Emergency Tertiary Intervention) सेवा मिळाल्यामुळे संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक बोजा न पडता वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचवता आले.
योजनेविषयी माहिती :
महाराष्ट्र शासनाने सर्वाना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी एकत्रित योजना राबवली आहे. या योजनेतून शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.
या सर्व योजना डॉ.काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथे उपलब्ध आहेत.
योजनेचे फायदे :
५ लाखांपर्यंत मोफत उपचार
१३५६ आजारांवर उपचार
आपत्कालीन सेवा (ETI) अंतर्गत तातडीचा लाभ
राज्यभरातील २००० हून अधिक अंगीकृत खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा उपलब्ध आहेत.