खर्डी येथे सीताराम महाराज “भंडारा” नामसप्ताह सुरू
यात्रेची सांगता अमावस्येला,पालखी प्रस्थान अक्कलकोट, गाणगापूर कडे होणार

संपादक – दिनेश खंडेलवाल
खर्डी येथे सीताराम महाराज “भंडारा” नामसप्ताह सुरू
यात्रेची सांगता अमावस्येला,पालखी प्रस्थान अक्कलकोट, गाणगापूर कडे होणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्र असणार्या खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने नामसप्ताहचे आयोजन ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. वार्षिक उत्सव असल्याने सर्वत्र खेळणी, पाळणे,हे बाल चमूचे आकर्षण असते. दररोज नित्यपूजा व कीर्तन प्रवचन भजन आदी कार्यक्रम होत आहेत. समाधी मंदिर दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू आहे. येथील मंदिरात दर गुरुवारी व अमावस्येला हजारो भाविक येत असतात. तसेच वार्षिक पुण्यतिथी सोहळा भंडारा साठी ही लाखो भाविक एकत्र येतात. दिवसातून दोन वेळा पूजा, आरती,नैवेद्य,हरिपाठ असा नित्यक्रम असतो. यासाठी समाधी मंदिर ट्रस्ट योग्य व्यवस्थापन करीत असते.
यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष दीपक रोंगे,बापू केसकर,विकास कुलकर्णी ,उमेशराव परिचारक आदींची बैठक झाली. हनुमान मंदिर पुजारी बाळासो मोकाशी,अमित मोकाशी आदी सह भाविक उपस्थित होते. पोलीस पाटील बालाजी रोंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले. यात्रा कालावधीत सांगोला पंढरपूर येथून विशेष बस गाड्यांची सोय केली आहे. यात्रेची सांगता अमावस्येला होणार असून २९ रोजी पालखी प्रदक्षिणा होईल नंतर पालखी अक्कलकोट,गाणगापूर प्रस्थान ठेवणार आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम स्वच्छता व आरोग्याची काळजी घेतली जात आहे. ग्रामविकास अधिकारी व्ही बी कुलकर्णी सरपंच मनीषा भगवान सव्वाशे बंदुलाल पठाण पाणी पुरवठा अण्णा कावरे प्रभू गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.