आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची कोल्हापूरात बैठक
शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समिती, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर ,मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर ,सरचिटणीस हेमंत संभूष,प्रवक्ते योगेश खैरे ,
यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक घेण्यात आली.
येत्या निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उमेदवार उभा करावा मनसेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी येणाऱ्या भाविकाळात मनसेही सत्ता स्थापनेत महत्त्वाचे स्थान मिळवणार असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच जोमाने तयारीला लागावे अशी प्रतिक्रिया म्हणजे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी व्यक्त केली याप्रसंगी
कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी बोलताना म्हणाले की मनसेची सर्व निवडणुकीची तयारी पूर्ण करून त्याचा आराखडा तयार करून व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करून आपले उमेदवार निवडून आणू यासाठी आम्ही आत्तापासूनच तयारीला लागतो अशा प्रकारची ग्वाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा संघटक पुंडलिक भाऊ जाधव ,जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले ,जिल्हाध्यक्ष गजानन जाधव ,कोल्हापूर शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले ,वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, हुपरीचे नगरसेवक दौलत पाटील,उपनगराध्यक्ष संतोष गायकवाड ,उपजिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ ,कामगार सेनेचे मोहन मालवणकर, जनहित जिल्हाध्यक्ष राजू पाटील ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य वैभव माळवे इत्यादी उपस्थित होते.