चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौठाळी गावच्या महीलांची दर्शन सहल
अँड.डी.एस.पाटील कौठाळी यांच्या ग्रुपच्या वतीने २५० महिलांना तीर्थक्षेत्र दर्शन सहल
संपादक-दिनेश खंडेलवाल
चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौठाळी गावच्या महीलांची दर्शन सहल
अँड.डी.एस.पाटील कौठाळी यांच्या ग्रुपच्या वतीने २५० महिलांना तीर्थक्षेत्र दर्शन सहल
पंढरपूर :- श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तसेच मंगळवेढ्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम घेतले. त्यातच कौठाळीचे युवा नेते ॲड.श्री.डी.एस. पाटील व यांच्या ग्रुपच्यावतीने २५० महिलांना तीर्थक्षेत्र यात्रा सहल काढण्यात आली.
तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा भाविकांसाठी पर्वकाळ मानला जातो. श्री क्षेत्र आळंदी, देहू, प्रति बालाजी व शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांचे देवदर्शन करण्यासाठी महिलांची तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गावातील साधारण २५० कुटूंबातील माता भगिनींना देवदर्शन घडले. दरम्यान होणारा प्रवास, भोजन इत्यादी सर्व खर्च डी.एस.पी. ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
यापूर्वीही डीएसपी ग्रुपचे वतीने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविलेले असून अशाप्रकारच्या सहलीचा उपक्रम तालुक्यात पाहिलाच असल्यामुळे त्याचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. देवदर्शनाला निघण्यापूर्वी कौठाळी येथील भैरवनाथ चौकामध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा वाढदिवस साजरा करून प्रवासासाठी निघणाऱ्या ट्रॅव्हल्स व वाहनाचे पूजन अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी विधी सेलचे तालुकाध्यक्ष अँड.दत्तात्रय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील ,लोणारी समाजाचे तालुकाध्यक्ष सागर गोडसे, विठ्ठल पाटील, महादेव इंगळे, नामदेव लेंडवे ,अनिल नागटिळक, अण्णासाहेब पाटील ,नवनाथ लेंडवे, समाधान नागटिळक, बाळकृष्ण नागटिळक, भैय्या पाटील, तानाजी धुमाळ, दामोदर इंगोले, अमोल अटकळे, अधिक भोसले, ग्रा.सदस्य सोमनाथ लोखंडे ,निलेश वाघमोडे, नितीन जाधव ,अनिल लवटे, प्रशांत कोरके, नितीन नागटिळक, शांताराम नागटिळक, नागनाथ नागटिळक ग्रा.सदस्य सौ.यशश्री पाटील पोलिस पाटील सौ. माधुरी नागटिळक आदीसह डीएसपी ग्रुपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
[कौठाळी गाव हे माझे कुटुंब असून गावातील सर्व नागारिक माझ्या कुटुंबांतील सदस्य आहेत त्यांना देवदर्शनाला घेऊन जाणे आमचे कर्तव्य असल्यामुळे डीएसपी ग्रुपच्या वतीने तीर्थयात्रेचे आयोजन केले होते. त्यामुळे माता भगिनींची सेवा करण्याचे भाग्य लाभले व येथून पुढेही लाभावे अशी भावना अँड.पाटील यांनी व्यक्त केली.
ॲड.दत्तात्रय पाटील (ग्रा पं. सदस्य,कौठाळी)
[कौटुंबिक जबाबदाऱ्यात व्यस्त असणाऱ्या माता-भगिनींना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कौठाळी येथील अॅड दत्तात्रय पाटील यांच्या ग्रुप च्या वतीने देवदर्शन घडावी ही भावनाच विलक्षण समाधान देणारी आहे वाढदिवशी अनेकांचे देवदर्शन व्हावे याहून पुण्याचे काम काय असू शकते अतिशय कल्पकतेने व सद्भावनेने दिलेली ही वाढदिवसाची अनोखी भेट मनाला भावली असून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी असल्याने दर्शनासाठी गेलेल्या महिलांसाठी समाधान देणारी आहे.
अभिजीत पाटील
चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना]