लक्ष्मी टाकळीच्या सरपंचपदी संजय साठे तर उपसरपंचपदी महादेव पवार
शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांनी फडकाविला मुख्यमंत्री शिंदे गटाचा ग्रामपंचायत वर झेंडा
संपादक-दिनेश खंडेलवाल
लक्ष्मी टाकळीच्या सरपंचपदी संजय साठे तर उपसरपंचपदी महादेव पवार
शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांनी फडकाविला मुख्यमंत्री शिंदे गटाचा ग्रामपंचायत वर झेंडा
शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांनी युती करत दोन्ही निवडी केल्या बिनविरोध
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच पदासाठी आज कोणताही अर्ज न आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे गटाचे सरपंच झाल्याने गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत सोलापूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांचे बंधु संजय देविदास साठे यांची तर उपसरपंचपदी भाजप परिचारक गटाचे महादेव विठ्ठल पवार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे राज्यातील महायुतीचा थेट प्रत्यय या निवडणुकीत दिसून आला आहे.
१७ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी लक्ष्मी टाकळी येथे पार पडली. यामध्ये वरील दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच आणि उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रिंगण चव्हाण यांनी जाहीर केले.
सदर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत परिचारक गटाचे नेते जिल्हा परिषद रामदास ढोणे यांच्या गटाचे ७ तर महेशनाना साठे यांच्या गटाचे ४ सदस्य तर विरोधी गटाला उर्वरित जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजप आणि शिवसेना अशी युती करीत सुरुवातीला भाजपला सरपंच आणि सेनेला उपसरपंच पद दिले होते. यानंतर आता सेनेला सरपंच आणि भाजपला उपसरपंच देऊन राज्यात असलेल्या महायुतीचा प्रत्यत लक्ष्मी टाकली ग्राम पंचायतीत पहावयास मिळाला आहे.
राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान होताच पहिल्याच फेरीत आषाढी एकादशीचा मान मिळाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील सेनेचा पहिला मेळावा महेशनाना साठे यांनी घेतला होता. काही दिवसातच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यावेळी पंढरपूर लगत असलेली ग्रामपंचायत महायुतीला मिळाली. आता तर थेट मुख्यमंत्री गटाला साठे बंधू यांच्या प्रयत्नाने सरपंचपद मिळाले आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत वादात न पडता आपले पक्ष वाढीचे काम करून दाखवीत थेट महेशनाना साठे यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावून दाखविला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नजरेत अजून भक्कम स्थान निर्माण झाले आहे.
या निवडीचे वेळी माजी सरपंच विजयमाला वाळके, सौ नागरबाई साठे, सौ आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे,नंदकुमार वाघमारे, सौ रेश्मा साठे, सौ रोहिणी साठे, सौ रुपाली कारंडे, सागर सोनवणे, हे सदस्य उपस्थित होते. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होताच जल्लोष साजरा करून सत्कार करण्यात आले. यावेळी रामदास ढोणे, महेशनाना साठे, सचिन वाळके, यांच्यासह परिचारक गट आणि साठे गटाचे अनेक समर्थक उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी टाकळी गावांत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करून स्वागत करण्यात आले.
चौकट——-
[ नगरपंचायतची वचनपूर्ती करणार : सरपंच संजय देविदास साठे
पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही सेनेतर्फे या टाकळी ग्रामपंचायतीला विविध विकास कामाबरोबरच आपलं लक्ष्मी टाकळी गाव नगरपंचायत करू असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. त्याचा जलद पाठपुरावा करून लक्ष्मी टाकळी लवकरच नगरपंचायत करून दाखविणार आहे. तसेच २२ कोटी ३८ लाखाची पाणी पुरवठा योजना राबवून टाकळी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करुन प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करणार आहे.
मुलभुत सुविधेवर भर ठेवुन सर्वांगिन विकास करत मुलभूत सुविधा देणार
विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नसल्याचे नूतन सरपंच संजय साठे यांनी जाहीर केले आहे.]