ईतरराज्य

लक्ष्मी टाकळी येथे ओढ्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

प्रतिभाताई परिचारक नगर मधील नागरिकांची गैरसोय दूर होणार

संपादक – दिनेश खंडेलवाल 

लक्ष्मी टाकळी येथे ओढ्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

प्रतिभाताई परिचारक नगर मधील नागरिकांची गैरसोय दूर होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महेशनाना साठे यांच्या मुळे शक्य

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील प्रतिभाताई परिचारक नगर मधील नागरिकांची ओढ्या अभावी गैरसोय होत होती. परंतु आता ही गैरसोय दूर होऊन त्यांना वाहतुकीचा सुरळीत मार्ग सरपंच संजय साठे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध होणार आहे.

प्रतिभाताई परिचारक नगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ओढ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सांडपाणी व्यवस्थापनातून मिळालेला ६५ लाख रुपये रकमेचा भरघोस निधी हा एकनाथ शिंदे व महेशनाना साठे यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. शासनाच्या अडचणींवर मात करून कमिटी नेमली, सर्वेक्षण केले आणि आज या कामाची सुरुवात घडवून आणता आली असल्याची माहिती सरपंच संजय साठे यांनी “वारकरी न्यूज” शी बोलताना दिली.

ओढा झाकणे व ९० टक्के सांडपाणी दुर्गंधी मुक्त करणे या कामात महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोठे योगदान लाभले. इतिहासात प्रथमच लक्ष्मी टाकळीला आषाढी वारी तीर्थक्षेत्रात समाविष्ट करून ३०० टॉयलेट, ५०० बाथरूम आणि ३० वॉटर टँकर मिळाले होते.

ठाकरे चौक, लक्ष्मी टाकळी चौक, रेल्वे फ्लायओव्हर प्रकल्पासाठी ५८ कोटी निधी मंजूर झाला आहे. समाजकल्याण विभागातून विशेष प्रयत्नांनी १ कोटींचा निधी मिळाला आहे. मागील यात्रेत घेतलेली शपथ पूर्ण करत यंदा शिवेवरील लक्ष्मी आई मंदिराकडे जाणारा रस्ता मुरुमाच्या रुंद रस्त्यावरून यात्रेत नेण्याचा मान मिळाला. लक्ष्मी टाकळी येथील जनतेच्या आशीर्वादाने व पाठिंबा मुळेच आमचे साठे कुटुंब तुमच्या सेवेकरिता सदैव कटिबद्ध आहे. अशी ग्वाही संजय साठे व महेश नाना साठे यांनी दिली.

यावेळी मा.जि.प.सदस्य रामदास ढोणे सरपंच संजय तात्या साठे ,उपसरपंच रुपाली करंडे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, ग्रामपंचायत सदस्य सागरसोनवणे,ग्रामपंचायत सदस्या नागरबाई साठे, ग्रामपंचायत सदस्या आशाबाई देवकाते, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा साठे ,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी साठे ,ग्रामपंचायत सदस्या व माजी सरपंच विजयमाला वाळके, ग्रामसेवक जयंत खंडागळे प्रशांत (बापू) डोंगरे ,पैगंबर शेख ,रोंगे सर प्रा.अनंत गिरवीकर कुलकर्णी, आबासाहेब खरात, ॲड.चंद्रशेखर पोरे ,रमेश जाधव सर ,मनोज लांबोरे ,अथर्व लांबोरे, प्रवीण देशपांडे ,दीपक देशपांडे काका,भानुदास शिंदे सर,अकबर आतार, हुसेन तांबोळी, समाधान नवगिरे, दत्ता शेटे कड्डी सर, श्याम देशपांडे ,देवल काका ,राजू पेंटर ,राठोड काका ,पांडूरंग जानकर, ज्ञानेश्वर चोरमुले,लखन आदमाने. ओंकार कापसे गुरुजी रमेश मोरे साहेब लखन भोंडवे, शिवाजी खडतरे,समिर तांबोळी, हरिश्चंद्र कवडे काका उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यामध्ये लिमये मॅडम, प्रियांका कवडे, सौदागर मॅडम, जानकर काकू, देवल काकू, चुंबळकर काकू, कुलकर्णी काकू, तब्बू शेख, रूपाली शेटे,जुबेर तांबोळी इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close