“सर्वांचेच जीवन पणतीप्रमाणे प्रज्वलित व्हावे” :- रवि वसंत सोनार
सोनार दांपत्यांकडून अभ्यासिकेस सौर कंदील भेट देऊन नववर्षाची सुरुवात.....

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : “सर्वांचे जीवन पणतीप्रमाणे प्रज्वलित व्हावे आणि एकूणच मानवी जीवन प्रकाशमय व्हावे.” असे मत सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्ष सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आदी विभागातील उपक्रमांतर्गत २०२२ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्तद्वार वाचनालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेस सौर कंदील भेट उपक्रमावेळी बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की “अभ्यासिकेत काही कारणास्तव वीज यंत्रणेत काही बिघाड झाला तर तिथे अभ्यास करणाऱ्यांना सौर कंदिलामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रकाश मिळून अभ्यास सुरू राहावा आणि अभ्यासार्थीचे भविष्य अधिकाधिक उज्ज्वल व्हावे म्हणून हा खारीचा वाटा.”
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात संपन्न झालेल्या या उपक्रमावेळी वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य भाऊकाका ताठे, संतोष भोसेकर, योगेश पडवळे, सचिन चुंबळकर, प्रशांत घोडके, श्री. व सौ. डॉ. मैत्रेयी मंदार केसकर, श्री. व सौ. माधुरी प्रतापसिंह चव्हाण, कवी रवि सोनार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार, सुकन्या रेवती सोनार व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि सोनार स्नेह परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com