लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने २५ लाखाचा दावा दाखल
लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय शिवाजीराव देशमुख यांची माहिती

संपादक – दिनेश खंडेलवाल
लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने २५ लाखाचा दावा दाखल
लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय शिवाजीराव देशमुख यांची माहिती
![]()
पंढरपूर:- पंढरपूर शहर व तालुक्यात अल्पावधीतच रुग्णांना चांगली व योग्य सेवा देणाऱ्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामी तसेच हॉस्पिटलची प्रतिष्ठा मलीन करण्याच्या हेतूने चुकीचे व अपूर्ण माहिती घेऊन वृत्त प्रसिद्ध केलेल्या न्यूज इंडिया मराठी या वृत्त वाहिनीवर तसेच रिपोर्टर भारत शिंदे यांच्यावर एकत्रित २५ लाखाचा नुकसान भरपाई दावा सी.पी.सी.कलम १९ प्रमाणे नुकसान भरपाई आणि कायमस्वरूपी मनाई हुकुम यासाठी पंढरपूर न्यायालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये रुग्णांना तेथील सर्व डॉक्टर योग्य प्रकारे सेवा व उपचार देण्याचे काम करतात मात्र तरीही हॉस्पिटलच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने व बदनामी आणि प्रतिष्ठा मलीन करण्याच्या दृष्ट हेतूने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बदनामी होईल अशा पद्धतीने व्हिडिओ वृत्त प्रसारित केल्याने हॉस्पिटलची प्रतिष्ठा मलिन झाली असून हॉस्पिटलचे डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर मंजुषा देशमुख यांची बदनामी तसेच मानहानी झाली आहे.

दरम्यान पोलीस स्टेशन येथे केलेल्या तक्रार अर्जामधील अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीची बातमी पसरवली, केवळ तक्रार अर्जाद्वारे कोणत्याही डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. मेडिकल एक्सपर्ट टीमचा अहवाल आल्यानंतर मेडिकल नियमाप्रमाणे गुन्हा दाखल होतो. अन्यथा तो रद्दबातल होतो. फक्त तक्रार अर्ज करणे म्हणजे डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला असे होत नाही हे माहिती असूनही लाईफलाईन हॉस्पिटल व हॉस्पिटल मधील डॉक्टरांविरुद्ध चुकीची बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने हा दावा दाखल केला असल्याचे डॉक्टर संजय देशमुख यांनी सांगितले.

मात्र समाजामध्ये असे काही विघ्न संतोषी व्यक्ती असतात की ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही थराला जातात आणि इतरांच्या खांद्याचा वापर करतात.


