
संपादक – दिनेश खंडेलवाल
त्वचारोगावर लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी
सर्व त्वचारोग व कॉस्मेटिक समस्यांवर तज्ञ डॉक्टर कडून होणार तपासणी
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्याबरोबरच पंढरपूर शहर व तालुक्यातील त्वचा रुग्णांसाठी राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्राने सन्मानित लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत त्वचारोग तज्ञ डॉक्टर मार्फत सर्व प्रकारच्या समस्येवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सौ. मंजुषा देशमुख व डॉ. संजय देशमुख यांनी दिली.
पुणे येथील प्रदीर्घ अनुभव असलेल्या त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग तज्ञ डॉक्टर पौरवी शिंदे या लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग संबंधी समस्या असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार करणार आहेत.
सर्व प्रकारच्या त्वचारोगासंबंधी तसेच कॉस्मेटोलॉजी संबंधी अथवा गुप्तरोग किंवा कुष्ठरोग असलेल्या रुग्णांवर उपचाराचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर पौरवी शिंदे पंढरपुरातील सर्वसामान्य रुग्णांची आरोग्यदायींनी समजल्या जाणाऱ्या लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध होत असून त्यांच्या रुग्णसेवेचा लाभ रुग्णांना नक्कीच होणार आहे.
ज्या रुग्णांना वरील कोणत्याही आजाराच्या समस्या असतील अशा रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर सौ. मंजुषा देशमुख यांनी केले आहे.