ईतरबिझनेस

लाईफलाईन सुपरस्पेशलिटी मध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ

मुंबई, मदुराई, हैद्राबाद येथील कार्यरत प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विश्वजीत रमेशराव देशमुख पंढरपुरात देणार सेवा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

लाईफलाईन सुपरस्पेशलिटी मध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ

मुंबई, मदुराई, हैद्राबाद येथील कार्यरत प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विश्वजीत रमेशराव देशमुख पंढरपुरात देणार सेवा

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहर आणि तालुक्याची आरोग्यदायीनी म्हणून समजल्या जाणाऱ्या पंढरीच्या लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेत्ररोग रुग्णांसाठी अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. यापूर्वी नेत्रतज्ञ डॉ. विश्वजित रमेशराव देशमुख यांनी मुंबई, मदुराई, हैद्राबाद याठिकाणी कार्यरत होते. आता पंढरपूर शहर व तालुक्यातील नेत्र रुग्णांसाठी पंढरपुरात उपलब्ध होणार आहेत.

लाईफलाईन हॉस्पिटल म्हणजे पंढरपूर येथील नामांकित वैद्यकीय उपचारासाठी प्रसिद्ध असणारे सर्वसामान्यांचे हॉस्पिटल असुन यामध्ये त्यांनी नव्याने अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाची सुरूवात होत आहे. या नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ.शुभांगी व श्री रमेशराव माणिकराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील,माजी आमदार शहाजी बापु पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा अध्यक्ष वसंत (नाना) देशमुख,माजी चेअरमन भगिरथ (दादा) भालके, जयसिंग (नाना) देशमुख, प्रशांत (भैय्या) देशमुख, डॉ.ऋतुजा उत्पात, डॉ.अमरसिंह जमदाडे, डॉ.अमितकुमार आसबे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

तरी सर्वांनी या नुतन अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर सौ. मंजुषा देशमुख तसेच हॉस्पिटल डॉक्टर्स स्टाफ आणि व्यवस्थापनांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close