ईतरसामाजिक

माढा मतदार संघात आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

नामवंत डॉक्टर व कॅन्सर तज्ञांकडून होणार तपासणी

संपादक – दिनेश खंडेलवाल 

माढा मतदार संघात आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

नामवंत डॉक्टर व कॅन्सर तज्ञांकडून होणार तपासणी

जाहिरात….    जाहिरात….     जाहिरात…. 

पंढरपूर(प्रतिनिधी):- माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील आबाल वृद्धापर्यंत सर्वांसाठी धकाधकीच्या जीवनातून व बदलत्या जीवनशैलीतून होणारे विविध आजारावर तपासणी व उपचार करण्याकरिता नामवंत वैद्यकीय अधिकारी व कॅन्सर तज्ञांकडून तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे.

जाहिरात…    जाहिरात……   जाहिरात……

सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने माढा मतदार संघात आरोग्य शिबीर आयोजित केले असल्याची माहिती विठ्ठल प्रतिष्ठान चे सदस्य व निकटवर्तीय नितीन सरडे यांनी दिली.

जाहिरात…..   जाहिरात….   जाहिरात…..

यावेळी बोलताना श्री सरडे म्हणाले की माढा तालुक्यातील महिला, पुरुष, लहान मुले,मुली यांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टर यांच्या कडून केली जाणार आहे. या मध्ये हाडांचे विकार,एक्सरे,वाचा दोष, मोफत शस्त्रक्रिया, नेत्ररोग तपासणी,चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंतरोग, स्त्री रोग, कॅन्सर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, केली जाणार आहे. कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

जाहिरात…..     जाहिरात…..   जाहिरात…..

यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजीत चोपडे, डॉक्टर प्रशांत निकम, डॉक्टर सुयोग बुरकुटे, डॉक्टर अनिल कोरे, डॉक्टर सारंग बुरकुटे जगदाळे हॉस्पिटल बार्शी, डॉ.गणेश इंदुलकर, डॉ.अनिल डांगर, डॉ.विठ्ठल लटके, डॉ.राहुल मांजरे पाटील हे बार्शी येथील कॅन्सर तज्ञ आदी नामवंत असलेली वैद्यकीय डॉक्टर मंडळी कडून उपचार केले जाणार आहे.

जाहिरात…..   जाहिरात……  जाहिरात……..

दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत माढा ग्रामीण रुग्णालय येथे बुधराणी हाॅस्पिटल पुणे व माढा शहर डॉक्टर असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे असेही नितीन सरडे यांनी शेवटी सांगितले.

जाहिरात……   जाहिरात……    जाहिरात….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close