पंढरपूर तालुक्याचे ४० वर्षांचे स्वप्न पूर्ण करून एक लाख रोजगाराच्या संधी देणार – अभिजीत पाटील
माढा मतदारसंघात केळी संशोधन केंद्र व ड्राय फोर्ट उभारणार
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर तालुक्याचे ४० वर्षांचे स्वप्न पूर्ण करून एक लाख रोजगाराच्या संधी देणार – अभिजीत पाटील
माढा मतदारसंघात केळी संशोधन केंद्र व ड्राय फोर्ट उभारणार
पंढरपूर/दिनेश खंडेलवाल:- २४५ माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत आबा पाटील यांनी माढा मतदारसंघाच्या गेल्या ३० वर्षातील अपूर्ण विकास पूर्ण करण्यासाठी तसेच या मतदारसंघांमध्ये युवकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक हब उभारणार असून या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी केळी संशोधन केंद्र, त्याचबरोबर ड्राय फोर्ट उभा करून येथील शेतकऱ्यांचा मालाची निर्यात करून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच पंढरपूर तालुक्याचे ४० वर्षांचे स्वप्न असणाऱ्या एमआयडीसीला पंढरपूर, मेंढापूर,आढीव,बाभूळगांव, गुरसाळे या तालुक्यातील गावाच्या शिवा वरती उभारून या ठिकाणी रोजगार निर्मिती करून एक लाख लोकांना येणाऱ्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस वारकरी न्यूज च्या “खास बात” मध्ये बोलताना व्यक्त केले
माढा मतदारसंघांमध्ये एकाच घरात तीस तीस वर्षे सत्ता असल्याने ते पालटण्यासाठी येथील जनता तयार आहे. महाराष्ट्रातही परिवर्तन होणार आहे. देशाचे नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चे सरकार स्थापन करण्यासाठी आता जनता तुतारी पुढील बटन दाबण्याकरता आतुर झालेली संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते.
माढा मतदारसंघांमध्ये निवडणूक विधानसभेची असताना कारखान्याचा विषय घोळवत ठेवून तो इतरत्र नेण्याचं काम विरोधक करत आहेत. त्यांनी आजपर्यंत या मतदारसंघात विकास केला नाही. विकास केला असेल तर त्यावर बोला, त्यांना बोलताही येत नाही, काम करता येत नाही अशी तर्हा दिसते आहे.
या मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे सध्या विठ्ठल कारखान्याची गाळपाची क्षमता आठ हजारावरून १४ हजारांवर नेतोय त्यामुळे जास्तीत जास्त गाळप होणार आहे. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होत असून या ठिकाणी केळी संशोधन केंद्र उभारणे, केळी निर्यात होण्याकरिता या ठिकाणी ड्राय फोर्ट च्या माध्यमातून योजना करावी लागेल ज्या पद्धतीने सातारा व जालन्याला ड्राय फोर्ट आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी ड्राय फोर्ट झाल्यास येथील शेतकऱ्यांचा शेतमाल द्राक्ष, डाळिंब, बेदाणा, कांदा, बोर, साखर हे त्या ठिकाणी ठेवून निर्यात व्हावे यासाठी प्रयत्न राहील. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. यासाठी माझे सर्वप्रथम प्रयत्न राहणार आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना सरकार ५० हजारापर्यंत अनुदान देण्याची भूमिका पवार साहेबांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
माढा तालुक्यात अनेक गावातून मोठ्या प्रमाणात सरकारी उच्च पदावर या ठिकाणचे युवक नोकरी करत आहेत. परंतु या ठिकाणी शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाही. काहीजण बाहेर जाऊन शिक्षण घेतात. हुशार मुलींना गावातच शिक्षण मिळावे यासाठी आपली भूमिका राहणार असून या मतदारसंघात शैक्षणिक हब उभारणार आहे. ज्यामुळे याच ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहणार.
माढ्या मध्ये ८५० एकर जमीन सरकारची आहे.
त्या ठिकाणी एम एस सी खाली औद्योगिक वसाहत निर्माण करायचे मोडनिंब च्या एमआयडीसीला बळ द्यायचं आणि पंढरपूर तालुक्याचे चाळीस वर्षाचं स्वप्न असणाऱ्या एमआयडीसीसाठी पंढरपूर मेंढापूर, आढीव, बाभुळगाव, गुरसाळे या गावांच्या शिवा वरती उभारून या ठिकाणी मोठे उद्योग उभा करून रोजगार निर्मिती करायची, येणाऱ्या काळामध्ये येथील एक लाख युवकांना, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार झाल्यानंतर प्रत्येक वर्षासाठी कोणत्या पद्धतीने काम करायचे याबाबत या मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याने या भागाचा कायापालट केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वासही त्यांनी खास बात मध्ये बोलताना व्यक्त केला.