
संपादक – दिनेश खंडेलवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिरात तुळसीपुजन व नामदेव पायरी येथे महाआरती
आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम उत्साहात साजरे
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुलसीपुजनाच्या माध्यमातून व नामदेव पायरी येथे महाआरतीतून मुख्यमंत्री महोदयांच्या दीर्घायुष्याकरिता व निरोगी आयुष्याकरिता मंगलमय वातावरणात मनोकामना केली.
आज जन्मदिनाचे औचित्य साधत जाहिरात, होर्डिंग, मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर अनावश्यक खर्च न करता संपुर्ण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिरे तसेच ५५,५५५ झाडांचे वृक्षारोपन व संवर्धन असे व यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. सेवा दिन म्हणून हा जन्मदिन साजरा केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात व राज्यात ही ‘‘महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस’’ हा खऱ्या अर्थाने सेवाभाव व समर्पित कार्यातून साजरा होतो आहे. हीच नेतृत्वाची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.