श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानदुतांचे महाळुंग येथे आगमन
उद्यानदुत करणार गावातील शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन;नगराध्यक्षांनी केले स्वागत
संपादक – दिनेश खंडेलवाल
श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानदुतांचे महाळुंग येथे आगमन
उद्यानदुत करणार गावातील शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन;नगराध्यक्षांनी केले स्वागत
महाळुंग(प्रतिनिधी):- माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालय पानीव येथील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या उद्यान दुतांचे आगमन झाले. स्थानिक शेतकऱ्यांना विविध पिकासंदर्भात माहिती देऊन कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात येतो.
श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानदुतांचे महाळुंग गावात शेतकऱ्यांच्या समवेत आगमन झाले. उद्यानदुत हे पुढील तीन महिने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी उपस्थित प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
विविध पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि कृषीसोबत कृषीपुरक व्यवसाय याविषयी देखील शेतकऱ्यांना हे उद्यानदुत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना विविध आधुनिक तंत्रज्ञान तसेच जास्तीत जास्त उत्पन्न मिळणाऱ्या पद्धतीची माहिती देऊन मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
या कार्यक्रमावेळी महाळुंग शहराचे माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण व ग्रामस्थ यांनी उद्यानदुत गणेश पारखे, प्रतिक सुरवसे, ऋषिकेश पेटकर, धीरज साळुंखे, विराज रास्ते, अभिजीत सरडे यांचे स्वागत केले.
यासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) पाटील,मार्गदर्शिका मा.सौ. श्रीलेखा पाटील, सचिव ॲड.अभिषेकभैय्या पाटील, सहसचिव करणभैय्या पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग कोळेकर ,उपप्राचार्य. डॉ.शुभम भोसले, प्रा. दत्तात्रय राऊत, प्रा.अमोल देवकाते (कार्यक्रम अधिकारी), प्रा.जीवन सावळकर, प्रा.धीरज दोरकर, प्रा.अश्विनी फुटाणे, प्रा. विजय तरंगे , प्रा. सुगंध शिंदे यांचे सदर उपक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचा स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला.