पंढरीत सकल जैन समाजाचे महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात
शहराच्या विविध भागातून काढली शोभायात्रा विविध ठिकाणी झाले स्वागत
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर: सकल जैन समाज पंढरपूर आणि श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सकल जैन समाज सोलापूर ,पुणे,सातारा, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड आणि मुंबई या सात जिल्ह्यांची सर्वोदयी विश्व धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर 2621 व्या जन्म कल्याणका निमित्त श्री 1008 भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता. चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने प पू गणिती आर्यिका 105 शांतमती माताजीं यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला .
भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी क्रांती महिला मंडळ , सुमनश्री महिला मंडळ व पद्मावती महिला मंडळ यांची दिंडी , स्वयंसिद्ध महिला मंडळाचे लेझीम पथक, शुभश्री महिला मंडळाचा गरबा नृत्य,महावीर ढोल पथक पंढरपूरचे ढोल पथक आणि सिद्धश्री महिला मंडळ यांचा पोवाडा,स्वानुभुती मंडळाचे मंगलाचरण, पालवीतील बालकांनी नाट्य सादर केले . त्यानंतर प पू गणिती आर्यिका 105 शांतमती माताजीं यांचे प्रवचन झाले.
शोभायात्रा सकाळी 11.45 च्या सुमारास
तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे विसर्जित होऊन तेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ सतीश जंबूकुमार दोशी अकलुज, मंडप उद्घाटक म्हणून डॉ शीतल कांतीलाल शहा पंढरपूर, स्वागताध्यक्षपदी राजेंद्र कस्तुरचंद दोशी पंढरपूर तर ध्वजारोहण डॉ राजेश फडे आणि कै प्रतापचंद हिराचंद गांधी परिवार आणि भगवान महावीर फोटोसाठी दातार धर्मेंद्र पोपटलाल गांधी हे होते.
या कार्यक्रमाच्या वेळी आमदार प्रशांत परिचारक, डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके,रोहन परिचारक, प्रणव परिचारक, नगरसेवक सर्वश्री गुरुनाथ अभ्यंकर,डी राज सर्वगोड,विक्रम शिरसाट, धर्मराज घोडके,इब्राहीम बोहरी,प्रशांत शिंदे ,सुधीर धोत्रे,विवेक परदेशी, दत्ता धोत्रे, श्री बडवे,श्री उत्पात, किरण घाडगे, सुधिर धुमाळ, रामचंद्र धोत्रे, सुनील सर्वगोड, पांडुरंग सहकारीचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे,संजय बंदपट्टे ,संदीप माने आदीसह भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश सचिव अजीत संचेती उपस्थित होते.
पंढरपूर सकल जैन समाज आणि श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी,अध्यक्ष वीरकुमार दोशी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच पंढरपूर येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार,पार्श्वनाथ दिगंबर जैन महावीरनगर (फडे जैन मंदिर), श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीरसागर नगर,त्रिलोक तीर्थक्षेत्र शेगाव दुमाला यांच्यावतीने करण्यात आले होते. या शोभायात्रेत श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्वला शहा, स्मिता शहा, नेहा दोशी यांनी केले.