म्हसवड येथील नागोबाच्या यात्रेतील बैलबाजार प्रशासनाच्या सहकार्यामुळेच शक्य – विलासराव देशमुख
कोरोना चे नियम पाळत मंदिर दर्शनासाठी खुले दोन वर्षानंतर भरणार यात्रा
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
दहिवडी:प्रविण राजे — माण तालुक्यातील म्हसवड शहर हद्दीतील नागोबा यात्रा जनावरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रत ओळखली जाते मात्र कोरोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षामध्ये यात्रा व जनावरांचा बाजार रद्द झाला होता. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र यावर्षी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुन यात्रा भरवण्याची परवानगी दिल्या नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे व जनावरांचा बाजार भरवण्यात आला आहे. दहिवडी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट पूर्ण जगभर पसरले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कोणताही उत्सव साजरा केला जाऊ शकत न्हवता किंवा कोणत्याही देवस्थानला यात्रेसाठी परवानगी दिली गेली न्हवती. अशामध्ये म्हसवड नजीक असणारे नागोबा देवस्थान जे संपूर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या यात्रेसाठी ओळखलं जाते ती सुद्धा यात्रा रद्द करावी लागली होती. आणि केवळ यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठया आर्थिक नुकसानास तोंड द्यावे लागेल होते. पण यावर्षी मात्र सर्व शेतकरी वर्गाने यात्रा कमिटी आणि दहिवडी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने प्रशासनासमोर आपले गाऱ्हाने मांडले. आणि प्रशासनाने सर्व बाजूने विचार करून काही निर्बंध घालत अखेर बैलबाजारास परवानगी दिली. तब्बला दोन वर्षा नंतर जनावरांचा बाजार भरल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. बाजार भरल्यामुळे व नुकतीच कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यामुळे आपल्या जनावरांना चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकर्यांना वाटत आहे.
[चौकट……….
केवळ बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली जणावरे कवडीमोल भावामध्ये विकावी लागत होती. फक्त या यात्रेमधील बैलबाजार भरला तरच शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून आर्थिक नुकसान भरून निघणार होते. शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी आम्ही कायमच त्यांच्या सोबत आहोत – सभापती विलासराव देशमुख]
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com