राजकिय

अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ रविवारी खा. सुप्रिया सुळे यांची सभा

प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे राहुल शहांचे आवाहन

संपादक – दिनेश खंडेलवाल

अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ रविवारी खा. सुप्रिया सुळे यांची सभा

प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे राहुल शहांचे आवाहन

पंढपूर(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ रविवार दि. १७ रोजी मंगळवेढा येथे भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे. अनिल सावंत यांनी या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारली असून पक्षाचा बालेकिल्ला ते शाबूत राखतील असा विश्वास निर्माण झाल्याने पक्षाने पंढरपूर विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याचे रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी सांगितले.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समोर तगडे आव्हान उभा केले आहे. अनिल सावंत यांनी प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवली आहे. माढा चे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नेते वसंतराव देशमुख, शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, माजी नगरसेवक संतोष नेहतराव, रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहर, तालुक्यातील २२ गावे आणि मंगळवेढा शहर व तालुक्यात अतिशय नियोजनबद्ध यंत्रणा राबवली आहे. तुतारी हे पक्षचिन्ह घरोघरी पोहोचवण्यात यश आले असून पंढरपूर शहरातील आजी माजी १० नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी कामास लागले आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भव्य सभा शहरात संपन्न झाली. त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत यांचे नाव घरोघरी चर्चेत आले आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरातील आठवडी बाजार तळ येथे रविवार सकाळी साडे दहा वाजता पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हि राहुल शहा यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close