मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकाची निर्मिती कॉंग्रेसमुळेच रखडली..!
कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांचा आरोप
संपादक – दिनेश खंडेलवाल
मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकाची निर्मिती कॉंग्रेसमुळेच रखडली..!
कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांचा आरोप
मंगळवेढा(प्रतिनिधी):- बाराव्या शतकात सर्व प्रथम महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाहीचा पाया रचून अनुभव मंडपाव्दारे संसदेची निर्मिती केली. मंगळवेढ्यात जगतजोती महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक निर्मितीसाठी कृती समितीने सतत पाठपुरावा केल्यामुळे राज्य सरकारने स्मारक समिती गठीत केली. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे ही समिती रदद झाली. त्यामुळे स्मारक निर्मितीचे काम रखडलेले आहे. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकाची निर्मिती कॉंग्रेसमुळेच रखडली असा आरोप कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.
मंगळवेढा ही संतांची भूमी असून बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांची कर्मभुमी आहे. महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी सबंध राज्यातुन मागणी होत असताना महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या पुढाकाराने स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले व अॅड. शिवानंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे समिती गठीत होण्याकरिता पाठपुरावा केला.
समिती गठीत झाल्यानंतर समितीचे कामकाज सुरू होवुन कृष्ण तलाव या जागेचा प्रस्ताव व त्याचा पाठपुरावा चालू असताना व तसा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठविला असताना या विषयाचे कामकाज प्रगतीपथावर असताना सदरची समिती रदद करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली. त्यानंतर सदरची समिती रदद झाली. स्मारक समिती रदद झाल्यामुळे याबाबत निधीची तरतूद अर्थमंत्री यांना करता आली नाही. वास्तविक महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक मंगळवेढा या ठिकाणी होणार असल्याने एक चांगले पर्यटन केंद्र होवून शहराच्या व तालुक्याच्या विकासात भर पडणार होती. पण काँग्रेसचे नेते आ. नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यामुळे समिती रदद झाल्यामुळे हे कार्य पुढे जावु शकले नाही.
पंढरपूर-मंगळवेढयाचे आ. समाधान आवताडे यांनी स्मारक कृतीसमितीने त्यांची भेट घेतल्यानंतर वेळोवेळी सकारात्मक भूमीका घेतली व हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना भेटून स्मारकाचे काम तांत्रिक अडचणी दूर करून पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केलेला आहे.
याऊलट काँग्रेस पक्षाकडून स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी विरोध केल्याचा कांगावा करत आहे आणि महाराष्ट्र शासन हे कार्य करण्यासाठी सक्षम असताना कर्नाटक सरकारकडे मदत मागत आहेत ही शरमेची बाब आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील महायुती सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करून लिंगायत समाजातील तरूण तरूणींना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. आणि महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबतीत व लिंगायत समाजाच्या प्रश्ना संदर्भात नेहमीच सकारात्मक राहीलेले आहेत. त्यामुळे हा विषय निवडणुकीनंतर गतिमान होणार आहे. अशी माहिती डॉ. बसवराज बगले,अॅड. शिवानंद पाटील,संतोष मोगले, रमेश भांजे,आनंद मुसतारे,शिवानंद हिरेमठ यांनी दिली आहे.