राज्यसामाजिक

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दाखवले मोठे दातृत्व स्वतःच्या शेतातील उभी मका पिक दिली पूरग्रस्त भागात

पशुधन वाचवण्यासाठी पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शेतातील चार एकर चारा भेट

संपादक – दिनेश खंडेलवाल 

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दाखवले मोठे दातृत्व स्वतःच्या शेतातील उभी मका पिक दिली पूरग्रस्त भागात

पशुधन वाचवण्यासाठी पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शेतातील चार एकर चारा भेट

पंढरपूर(प्रतिनिधी):- मागील काही दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनावरे दगावली होती. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मोठे दातृत्व दाखवत आपल्या स्वतःच्या शेतातील चार एकर क्षेत्रातील उभी मका पिक पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून भेट दिली आहे.

माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदार माढा यांच्याकडे पशुधनासाठी चारा देण्यात आला. माढा मतदारसंघातील पूरबाधीत भागांमध्ये पशुधन वाचवण्यासाठी ट्रॅक्टर मधून मका पिकाच्या बांधलेल्या पेंढ्या पाठवण्यात आल्या. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांसोबत स्वतः मनसे नेते दिलीप धोत्रे शेतात उतरून काम करताना दिसले.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत सापडले असून त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पदाधिकारी अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत पुरवत आहेत.

काही दिवसापूर्वी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेत शेतकऱ्यांना आणि घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख स्वरूपाची आर्थिक मदत केली होती. सध्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने पशुधनही वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली असून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील चार एकर उभी मका पिक काढून पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजकारणा बरोबरच समाजकारणात अग्रेसर तसेच संवेदनशील नेते म्हणून परिचित असलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पशुधन वाचवण्यासाठी दाखवलेल्या दाक्तृत्वाचा आदर्श राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी घ्यावा. अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल आप्पा बागल, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार,संजय गायकवाड, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे इत्यादी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close