
संपादक – दिनेश खंडेलवाल
मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलवा – आ. समाधान आवताडे
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आ.समाधान अवताडेंचा पाठिंबा
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राज्य सरकारकडे विधिमंडळाचे एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदानासह मुंबई शहरामध्ये आंदोलनासाठी पुन्हा एकदा एकवटला असून मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या मागणी प्रमाणे गरजवंत सकल मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे अशी सकल मराठा समाजाची तीव्र मागणी आहे.
ही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने मराठा समाजास आरक्षण मिळणेकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.