
संपादक – दिनेश खंडेलवाल
अजूनही वेळ गेली नाही सरकारने तोडगा काढावा – आ.अभिजीत पाटील
मराठा आरक्षणासाठी पंढरपूर व माढा तालुक्यातील मराठा बांधव मुंबईत दाखल
पंढरपूर(प्रतिनिधी):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चार महिन्यापूर्वी सरकारला अल्टिमेटम दिले होते. या कालावधीत सरकारने तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु अजूनही वेळ गेली नाही सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढावा असे मत माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मराठा समाजातील बांधवांना घेऊन मुंबईकडे जात असताना व्यक्त केले. दरम्यान आज सकाळीच सर्व मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.
माढा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अधिवेशनात पहिले भाषण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा वरील लढ्या बाबत प्रश्न उपस्थित केला होता, कि सरकारने भूमिका घ्यावी. दरम्यान गेल्या चार महिन्यापासून सरकारने याबाबत भूमिका समजून घेऊन तोडगा काढला असता तर आज सणासुदीच्या दिवसात मराठा बांधवांना आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईकडे जाण्याचा प्रसंगच आला नसता अजूनही वेळ गेली नाही सरकारने भूमिका स्पष्ट करावी असेही यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माझा पंढरपूर तालुका असेल मतदार संघातील माढा तालुका असेल मतदार संघाचा आणि तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील समाजबांधव तरुणांबरोबर आज मुंबईकडे निघालो आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघालो आहोत या लढ्यला न्याय नक्कीच मिळेल असे ही ते म्हणाले.