श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती; मात्र भाविकांना मास्क सक्ती नाही
भाविकांना मास्क वापरण्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांचे आवाहन
संपादक-दिनेश खंडेलवाल
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती; मात्र भाविकांना मास्क सक्ती नाही
भाविकांना मास्क वापरण्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांचे आवाहन
पंढरपूर : चीनसह काही देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रमुख मंदीर प्रशासन या बाबत सतर्क झाली आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. मात्र भाविकांना मास्क वापराबाबतची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही परंतु खबरदारी म्हणून मंदीरात दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन अप्पर जिल्हा अधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यामध्ये जेष्ठ नागरिक त्याचबरोबर लहान मुले असतात. दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून दर्शनासाठी येताना भाविकांनी आरोग्य हिताच्या द्ष्टीने मास्कचा वापर करावा.
भाविकांसाठी विठ्ठल मंदिर मास्क उपलब्ध करून देणार
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापराबाबतच्या सूचना पोहोचण्यास वेळ लागणार असल्याने येणाऱ्या भाविकांना दर्शनापासून वंचित राहू नये यासाठी मंदीर समितीच्या वतीने मास्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या बाबतचा निर्णय मंदीर समितीचे सह. अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी चर्चा करुन घेण्यात आला असल्याचे अप्पर जिल्हा अधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.