मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्ते व नागरिकांनी कायदेशीर बाबींचे पालन करावे – पो.नि.घोडके
दुचाकीच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनावर होणार कारवाई
संपादक – दिनेश खंडेलवाल
मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्ते व नागरिकांनी कायदेशीर बाबींचे पालन करावे – पो.नि.घोडके
दुचाकीच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनावर होणार कारवाई
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षेची व्यवस्था पोलीस प्रशासनाने पूर्ण केली असून निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना या ठिकाणी कोणीही गोंधळ वादविवाद न करता कायदेशीर बाबीचे पालन करावे असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केले आहे.
पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी आल्यानंतर त्यांना सुचित केलेल्या ठिकाणी थांबावयाचे आहे. जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येकाने कायदेशीर तरतुदीचे पालन करायचे आहे. विशेषत: जे तरुण युवक मोटरसायकलचे सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत वाहन चालवतात त्यांच्याकडे पोलीस प्रशासन विशेष लक्ष ठेवून अशा वाहनावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. मतमोजणी ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करायचे असून हुल्लडबाजी करणारे व कायदा भंग करणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाईल असेही यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले आहे.