ईतर

स्वकर्तृत्वावर समाज मनावर अधिराज्य गाजवणारा नेता—दिलीप बापू धोत्रे

मनसे शॅडो मंत्री दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

संपादक- दिनेश खंडेलवाल

स्वकर्तृत्वावर समाज मनावर अधिराज्य गाजवणारा नेता——दिलीप बापू धोत्रे

मनसे शॅडो मंत्री दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम करत असताना स्व कर्तुत्वावर समाजामध्ये आपल्या कार्याने ओळखणारा आदर्श नेता म्हणून दिलीप बापू धोत्रे यांना ओळखले जाते. सामाजिक काम व निष्ठा यांची दखल घेत सन्मानीय राजसाहेबांनी आज त्यांच्यावर मनसे पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे.

राजकारणाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांच्या व्यक्तीमत्वातील दातृत्व, कर्तृत्व हा गुण अधोरेखित झाला.त्याच्या स्वभावातच उपजतच सामाजातील वंचित लोकांसाठी भरभरून काम करण्याची धडपड असल्यामुळे त्यांचें नेतृत्व लोकप्रिय आहे.

गरजुंना मदत करत असताना त्यांनी पक्ष कधीही बघितलं नाही. फक्त गरजवंताना मदत मिळाली पाहिजे जे हेच त्यांना अभिप्रेत असते. म्हणूनच आज बापु फक्त मनसे परिवाराचेच नाहीत तर सर्व राजकीय पक्ष, अबाल वृध्द अगदी सर्व स्तरावर त्याचे स्नेहपूर्ण संबंध आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक लोकप्रिय आणि वजनदार नेता सोलापूरला मिळाला आहे. सोलापूरच काय तर महाराष्ट्रभर मनसे पक्ष बांधणी आणि पक्ष वाढीसाठी बापूचे फार मोठे योगदान आहे.

गरजवंताना बापुनी नेहमीच सढळ
हाताने मदत केली. अडचणीच्या काळात
अनेकांना आर्थिक मदत केली, शेतकरी,
महिला, तरुण, विद्यार्थी, पुरग्रस्त, मोफत
बि-बियाणे बचत गट, ऊस बील, मोफत
शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक फी. गोरगरीबांना मोफत कपडे, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, रुग्णावर माफक दरात इलाज, स्वच्छता मोहीम, धान्य वाटप, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अस कोणतही क्षेत्र नाही जिथे बापूच्या मदतीचा हात गेला नाही. हजारो गरजवंताना मदत दिली. कोरोना काळातील केलेली मदत विशेष उल्लेख करावा लागेल. बचत गटाकडून
जेव्हा सक्तीची वसुली चालु होती तेव्हा त्या बिकट स्थितीत बापूच धावून आले. जर सक्तीची वसुली थांबवली नाही तर गाठ मनसेशी आहे असा सज्जड दमच बापुनी भरला. तेव्हा त्याच्या शांत संयमी स्वभावामागे मनसे स्टाईलची चुणुक दिसुन आली. आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांना बापुनी मोठा दिलासा दिला. कोरोना काळातील त्याचे काम त्याच्यातील सामाजिक बांधिलकी दर्शवते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची मदत गरजवंताच्या उंबऱ्या पर्यंत पोहचली.

त्याच्या व्यक्तीमत्वातील त्याचा एक गुण मला आर्वजुन नमुद करावा वाटतो तो म्हणजे सामान्य कार्यकर्ते असोत वा नेता ते सर्वांचे फोन रिसिव्ह करतात. खुप कमी राजकीय नेत्याकडे हा गुण असतो. मी तर म्हणून जवळपास अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके माणसं आहेत. त्यापैकी एक आमच्या मनसे परिवाराचे आधारस्तंभ दिलीप धोत्रे आहेत. पक्ष बांधणीसाठी त्याचे दौरे असतील अथवा पक्षाचे विविध कार्यक्रम या निमित्ताने त्याचे दौरे बघता पायाला भिंगरी बांधणे या मराठी म्हणीचा अर्थ खऱ्या अर्थानि उमजतो. राजकीय विचाराचे नैतिक पतन झालेल्या माझ्या महाराष्ट्राची राजकीय घड़ी बसवण्यासाठी आणि माझ्या सन्मानीय राजसाहेबाच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी अर्थात साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आई
जगदंबे बापुंना उदंड आयुष्य देवो हिच
त्याच्यां जन्मदिनी मनसे सदिच्छा !!

कु. ज्योती ओमणे
जिल्हा उपाध्यक्ष महिला, सोलापूर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close