इस्त्रायलमध्ये भारताचा डंका:२१ वर्षांनंतर हरनाज संधू ठरली “मिस युनिव्हर्स”
८० देशांच्या स्पर्धकांमध्ये भारताने बाजी मारत मिस युनिव्हर्स चा मान मिळवला
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : इस्त्रायलमध्ये ८० देशाच्या स्पर्धकांनी मिस युनिव्हर्स साठी भाग घेतला होता. त्यामध्ये २१ वर्षांनंतर प्रथमच भारताला हरनाज संधू हिने ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला आहे.
सन २००० साली लारा दत्ता हिने ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला होता त्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर चंदीगड मधील मॉडेल हरणाज संधू मिस युनिव्हर्स झाली आहे. सध्या की चंदीगड मध्ये एमएच शिक्षण घेत आहे. सन १९९४ साली सुष्मिता सेन हिने हा मान मिळवला होता. त्यानंतर २००० साली लारा दत्ता हिने हा मान मिळवला होता आणि आता हरनाज संधू हिने पुन्हा एकदा “मिस युनिव्हर्स” किताब पटकावून ८० देशांच्या स्पर्धेत सर्वोच्च पद प्राप्त केले आहे.
‘मिस युनिव्हर्स २०२१’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने बाजी मारली आहे. इस्रायलमध्ये ही सौंदर्यस्पर्धा पार पडली.
अभिनेत्री लारा दत्ताने २००० मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट भारतात आणला. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.
या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरले. आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल असा प्रश्न टॉप ३ राऊंडमध्ये विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना हरनाज सिंधू म्हणाली स्वत:वर अतिविश्वास ठेवणं हा आजच्या तरुणाईवरील सर्वांत मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीवच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलुयात. तुम्ही समोर या इतरांशी बोला कारण तुमच्या आयुष्याला घडवणारे तुम्हीच आहात तुम्हीच स्वत:चा आवाज आहात मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आज मी याठिकाणी उभी आहे.
तिच्या या उत्तरामुळे ती ठरली या स्पर्धेतील सर्वोच्च पदाची मानकरी आणि तिला मिळाला मिस युनिव्हर्स २०२१ चा बहुमान.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com