एनआयटी कम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा
सलग १७ व्या वर्षी एनआयटी कॉम्प्युटरला मिळाला पुरस्कार

संपादक – दिनेश खंडेलवाल
एनआयटी कम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा
सलग १७ व्या वर्षी एनआयटी कॉम्प्युटरला मिळाला पुरस्कार
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजे एमकेसीएलच्या वतीने केला जाणारा उत्कृष्ट व्यावसायिकता व प्रवेशाचा अवार्ड यंदा सलग १७ व्या वर्षी एनआयटी कॉम्प्युटरला मिळाला
आज डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएल ची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळेस एनआयटी कंप्यूटर च्या वतीने सेंटर हेड गणेश जाधव व शाम गोगाव यांनी हा पुरस्कार एमकेसीएल च्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामत मॅडम यांचे हस्ते स्वीकारला. एम एस सी आय टी या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. रौप्य महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा एन आय टी कॉम्प्युटर्सला पुरस्कृत करण्यात आल्यानं एन आय टी कॉम्युटर मागील २३ वर्षा पासून राबवित असलेल्या विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रशिक्षण शासनाकडून आलेले वेगवेगळे प्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थी व गरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना केलेले सहकार्य व आजपर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेल्या विश्वास याबद्दल पुन्हा एकदा एमकेसीएल कडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी लोकल लीड सेंटर चे रोहित जेऊरकर, हारून शेख, विभागीय समन्वयक महेश पत्रीके, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, कुंभार, कौशल, डॉ दीपक पाटील, कटकधोंड, आदी उपस्थित होते.