ईतर

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे साधणार थेट जनतेशी संवाद….

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा

संपादक-दिनेश खंडेलवाल

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे साधणार थेट जनतेशी संवाद….

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा

पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार म्हणून मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी मतदार संघात विविध माध्यमांतून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच त्यांनी आज पत्रकार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी गावभेट दौरा सुरू करत असल्याचे जाहीर केले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संधात गाव भेट दौरा करणार आहेत.

गाव भेट दौरा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदैवत सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन सुरू होणार आहे. पुढे सायंकाळी ६ वाजता तपकिरी शेटफळ, रात्री ७ वाजता तनाळी, रात्री ८ वाजता तावशी, शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सिद्धेवाडी, सकाळी ९ वाजता शिरगाव, १० वाजता एकलासपुर, सायंकाळी ५ वाजता अनवली, सहा वाजता रांजणी, ७ वाजता मुंढेवाडी ८ वाजता गोपाळपूर, शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उंबरगाव, सकाळी ९ वाजता बोहाळी, १० वाजता कोर्टी, सायंकाळी ५ वाजता टाकळी, ७ वाजता गादेगाव,

रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरढोण, ९ वाजता कवठाळी, सायंकाळी ६ वाजता वाखरी, सायंकाळी ७ वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे. यादरम्यान मनसेनेचे दिलीप बापू धोत्रे जनतेशी हितगुज साधून समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ते पंढरपूर शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चा, काढून सर्व सामान्य जनतेला आपल्या कामाचा परिचय करून दिला आहे . दिलीप बापू धोत्रे यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेशी नाळ जोडली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचे विरोधका समोर मोठे आवाहन असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close