राज्य

सोलापूर जिल्ह्सात 75 हजार विद्यार्थ्यांनी गायले राष्ट्रगीत

राज्यातील नाविण्यापुर्ण उपक्रम

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : तालुक्यांतील भोसे येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा स्तरीय राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेणेत आला. सोलापूर जिल्ह्यातील १०२८ ग्रामपंचायती मधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गाऊन आझादी चा अमृतमहोत्सव साजरा केला.

भोसे येथे यशवंत विद्यालयाचे मैदानावर राष्ट्रगीत गायन घेणेस आले. या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव , गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच गणेश पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्राचार्य दादासाहेब गाडे, कु. रूपाली स्वामी , जयवंत गावंधरे, उप सरपंच भारत जमदाडे, नागनाथ काळे, ग्रामसेवक डी बी भुजबळ प्रमुख उपस्थित होते.

गावात देशभक्तीपर वातावरण तयार

स्फुर्तिगीते, देशभक्ती गीतांनी संपुर्ण गावात देशभक्तीपर वातावरण तयार झाले होते. विविध स्वातंत्र्य योध्दा च्या वेषभुषेतील विद्यार्थी अवतरले होते. ढोल ताशा अन् लेझीम खेळत खेळांचा साथ संगत करत विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला होता.
विविध रंगीबेरंगी फुगे… आझादीचा अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांनी मैदानावर मानवी साखळी करून चितारले होते.
मैदानावर भारताचा नकाशा रेखाटणेत आला होता. कोरोना नियंमांचे पालन करत आझादीला ७५ वर्षे पुर्ण झाले बद्दल महोत्सव साजरा करणेत आला. रंगेबेरंबी झेडपी फुलांनी संसद ग्राम, शाळा, अंगणवाडी व माध्यमिक शाळेचा परिसर सजविणेत आला होता.

राष्ट्रगीत कार्यक्रमात जिल्ह्यात 75 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग-
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

जिल्हयात आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अमृतमहोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्हयात ७५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व माध्यमिक शाळेमघ्ये कोरोना नियंमांचे पालन करीत राष्ट्रगीत घेणेत आले. ७५ हजार विद्यार्थी यांनी आज एकाच वेळी राष्ट्रगीत गायले.
माझी वसुंधरा व स्वच्छतेसाठी 7500 वसुंधरा दूत सक्रीय करणेत येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली. पंढरपूर तालुक्यांतील भोसे येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त जिल्ह्यात ७५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. असेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१, माझी वसुंधरा हे उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी चांगले आहेत. माझी वसुंधरा अंतर्गत वडाचे झाडाचे वृक्षारोपन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व मान्यवरांचे हस्त करणेत आले. भोसे ग्रापमचंयातीचे काम आदर्शवत आहे. ही ग्रामपंचायत पाहण्यासाठी परिपत्रक काढून ग्रानसेवकांना पाठविणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.

लोकसहभागातून सुरू केली रुग्णवाहिका सेवा

लोकांचे गरज लक्षात घेऊन लोकांनीच एकत्रीत येऊन लोकवर्गणी एकत्रीत करून रुग्णवाहिका खरेदी केली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व ह.भ.प. देहुकर महाराज यांचे हस्ते करणेत आले.
भोसे ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. सर्व गावात बंदीस्त गटार आहे. स्वच्छतेसाठी प्राधान्याने दिले जाते. पर्यावरण पोषक शाळा, लोकसहभागातून जलसंधारणाचे कामे हाती घेऊन बांबु लागवड व वृक्षलागवड केली आहे. वाढदिवस वृक्षलागवडीने साजरा केला जातो असे सरपंच गणेश पाटील सांगितले तसेच गावांसाठी आरोग्य केंद्राची इमारत मंजुर करणेची मागणीही त्यांनी यावेळी केली.

ई – ग्रामपंचायतचा शुभारंभ

क्युआर कोडचा सहाय्याने घरपट्टी व पाणी पट्टी आॅनलाईन भरणेची सुविधा भोसे ग्राप त्यास वतीने उपलब्ध करून दिली आहे. याचा शुभारंभ सिईओ स्वामी यांचे हस्ते करणेत आला. भोसे ग्राप ने विविध नाविन्य पुर्ण उपक्रम राबविले आहेत. नवीन शाळा खोल्यांचे लोकार्पण करणेत आले. अंगणवाडीस भेट देऊन कीट चे लोकार्पण महिलांना करणेत आले. उमेद अंतर्गंत बचतगटांना खेळते भांडवल चे धनादेशाचे वितरण करणेत आले.

जिल्ह्यात एकाच दिवशी एक हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये 75 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गायले राष्ट्रगीत

शाळांमध्ये दररोजच राष्ट्रगीत गायले जाते. ग्रामपंचायत कार्यालयात फक्त राष्ट्रीय सणादिवशी म्हणजे वर्षातून फक्त तीन वेळाच राष्ट्रगीत गायन होते. आज नववर्षाच्या पहिला दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे 75 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज सकाळी दहाच्या सुमारास सामुहिक राष्ट्रगीत गायले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात हा पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गांवभर व जिल्हाभर देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी यांनी केले .
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख त्यांना नेमून दिलेल्या तालुक्‍यांमध्ये हजर होते.
उत्तर सोलापूर तालुक्यांतील हगलूर ता. येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक सुमंत पौळ व शहाजी शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कोविड काळात उत्तम सेवा बजावलेल्या आशा स्वयंसेवीका वंदना मोरे व पुनम पौळ यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक राजकुमार साबळे यांनी केले.
यावेळी हगलूर सरपंच अरिफा पठाण, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, रफिक पठाण, दत्तात्रय नरवडे, माजी सरपंच राजकुमार शिंदे, मुख्याध्यापक सोमनाथ घोंगडे विद्या पवार ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close