महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
रविवारी ६ ऑक्टोबरला पंढरपुरात पुरस्काराचे वितरण
संपादक – दिनेश खंडेलवाल
महाराष्ट्र नवनिर्माण
शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
रविवारी ६ ऑक्टोबरला पंढरपुरात पुरस्काराचे वितरण
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्यावतीने राज्यस्तरीय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता शेठ मोरारजी कानजी सभागृह- स्टेशन रोड पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते आणि मनसे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष संजय चित्रे,मनसे नेते राजा चौगुले, मनसे नेते बाबू वागस्कर, पुणे शहर मनसे महिला अध्यक्ष वनिता वागस्कर, मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, मनसे लोकसभेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व निवड समितीचे सदस्य विनायक महिंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील संस्था आणि शाळा पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बालविकास जनकल्याण व सांस्कृतिक सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज, सोलापुरातील शेळगी येथील साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, धुळे येथील प्राथमिक विद्यामंदिर, आणि कोल्हापूर येथील प्री प्रायमरी स्कूल या संस्था आणि शाळांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय शिक्षकेतर पुरस्कारासाठी शाळा आणि महाविद्यालयात काम करणारे कर्मचारी लातूर जिल्ह्यातील जवळा येथील समता माध्यमिक विद्यालयाचे पांडुरंग देडे, मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर येथील कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रीकांत मेलगे, इचलकरंजी कलावंत मळा येथील अनंतराव भिडे विद्यामंदिरचे बाळासाहेब मोकाशी, आणि सोलापुरातील शिवाजी मराठी विद्यालयातील प्रभाकर कारंडे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारात पुणे येथील अरुणा चौधरी प्राथमिक विद्यलायतील मुख्याध्यापक हनुमंत बिनवडे, लातूर येथील जवाहर प्राथमिक शाळेचे प्रभाकर गोविंदवाड, पुण्याच्या डेक्कन जिमखाना येथील बाल शिक्षण मंदिरचे सुनीता चव्हाण, पालघर हमरापुर येथील इ एम ओ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे संजय पाटील, अहमदनगर पिसोरेखांड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुरेंद्र हातवळणे, नंदुरबार येथील तलावडीचे अनुदानित माध्यमिक आश्रम शाळेचे प्रकाश साळुंखे, सोलापूर येथील एस व्ही सी एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे रामेश्वर झाडे, रायगड जिल्ह्यातील वाकडी येथील अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित आश्रम शाळेचे श्रीमती क्रांती पाटील, धाराशिव तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयातील सुहास वडणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र बोडरे या मुख्याध्यापकांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
तर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील हंगरूळ खुर्द येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रकाश जाधव, लातूर जिल्ह्यातील मंगरूळचे ज्ञानवर्धिनी विद्यालयातील हनुमंत केंद्रे, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे अरुण विद्या मंदिरचे प्रशांत गुरव, सोलापूर येथील शरद चंद्र पवार प्रशालेचे अविनाश आलदर, धुळे जिल्ह्यातील नकाने येथील सौ कमलाबाई विसपुते प्राथमिक विद्यालयातील प्रवीण देवरे, पुणे येथील हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या श्रीमती प्रिया गोगावले, पुणे भोसरी येथील सेठ रामधारी रामचंद्र अग्रवाल प्राथमिक विद्यालयाचे दिनकर मुंडे, मुंबईतील गणेश नगर येथील एम पी एस गणेश नगर इंग्लिशचे श्रीमती वैशाली टंकसाळी, नाशिक बोकडदरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रदीप देवरे, नंदुरबार तळोदा येथील श्री एस एल माळी जुनिअर कॉलेजचे प्रा.रेखा चव्हाण, जळगाव पाचोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पुष्पलता पाटील, सोलापूर येथील हनमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मंजुषा कलशेट्टी, आणि सोलापूर जिल्ह्यातील मगरवाडीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अमर गोसावी या शिक्षकांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यभरातून आलेल्या या पुरस्कार निवडीसाठी माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलासचिव शिवाजी शिंदे,सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, सोलापूर लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, व पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रशांत इंगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांचा समावेश होता. या पत्रकार परिषदेला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, जयवंत हक्के, संतोष घोडके, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, विश्वास गजभार, अमर कुलकर्णी, जैनुद्दीन शेख, प्रकाश कोळी, अभि रंपुरे, वीरसंगाप्पा भोज आदींची उपस्थिती होती.