ईतर

पंढरपूर तालुक्यातील १७ गावात ७५ कोटीचा निधी देऊन विकासात्मक कामे केली – आ.यशवंत माने

प्रत्येक गावात एक कोटी पेक्षा जास्त निधी देऊन रखडलेला तारापूर नाला ते पुळुज रस्ता मार्गी लावला

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर तालुक्यातील १७ गावात ७५ कोटीचा निधी देऊन विकासात्मक कामे केली – आ.यशवंत माने

प्रत्येक गावात एक कोटी पेक्षा जास्त निधी देऊन रखडलेला तारापूर नाला ते पुळुज रस्ता मार्गी लावला

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील १७ गावे मोहोळ मतदारसंघात येत असल्याने या गावांच्या विकासासाठी मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत तात्या माने यांनी सुमारे ७५ कोटीचा निधी देऊन विकासात्मक व धोरणात्मक कामे केली असल्याचे पंढरपूरात घेतलेल्या जनता दरबारानंतर बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले की पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात एक कोटी पेक्षा जास्त निधी दिला. कोणाला ७ कोटी तर कोणाला ८ कोटी निधी देऊन कामे करण्यात आली. त्याचबरोबर अनेक दिवसापासून रखडलेला तारापूर नाला ते पुळुज रस्त्याचे काम मार्गी लावले,शंकरगांव ते सरकोली,फुलचीचोंली ते पोहरगांव, चळेपाटी ते चळे व चळे येथून बरडवस्ती रस्त्यासाठी निधी मंजूर केला. यामध्ये ७४ कोटी ५५ लाख ६१ हजाराचा निधी दिला. या १७ गावांमध्ये प्राधान्याने रस्त्याच्या कामाला जास्त मागणी आहे. अशा प्रकारे रस्त्याची कामे मार्गी लावली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जनता दरबारानंतर बोलताना सांगितली.

त्याचबरोबर मतदार संघाच्या विविध गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, सभामंडप, शाळेसाठी मदत, ड्रेनेज लाईन आदी पायाभूत कामांना प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे प्रत्येक गाव, वाड्यावस्त्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. १३० गावांमध्ये घराघरात पाणी पोहोचले असून वंचित राहिलेल्या ठिकाणीही पाणी कसे पोहचेल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून ते काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. मतदार संघामध्ये काम करताना आलेली व्यक्ती कोणत्या पार्टीची कोणत्या पक्षाची हे न पाहता आपला मतदार आहे. त्याचे काम प्राधान्याने केले पाहिजे या तत्त्वावर सर्वांचे कामे करून त्या व्यक्तीचे समाधान होईल असा प्रयत्न करतो.

रस्ते,आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग, आमदार विकास निधी, रोजगार हमी पाणंद, समाजकल्याण विभाग, जलजीवन मिशन, २५/१५,५०/५४,शिक्षण विभाग, जलसंधारण विभाग, रोजगार हमी योजना, महावितरण विभाग असे सर्व विभागाच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आली. मतदार संघातील शेतकर्यांचे पालेभाजीचा दर असेल दुधाचा दर असेल हे सोडवण्याला प्राधान्य देऊन आणि मतदार यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन विकासात्मक कामे होतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.


[……. पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिल्यास माझ्या विकासात्मक धोरणात्मक कामामुळे जनता मला नक्कीच स्वीकारेल असा ठाम विश्वास व्यक्त करत या मतदारसंघांमध्ये जे कोणी उमेदवारीसाठी फिरतात त्यांच्या बाबत सांगताना ते म्हणाले भारतामध्ये लोकशाही आहे. मोहोळ मतदार संघामध्ये आमदारकीच्या उमेदवारीसाठी जे कोणी फिरत आहेत व आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांना माझ्या शुभेच्छा.
आ.यशवंत माने]

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close