
संपादक – दिनेश खंडेलवाल
मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देणे ही भूमिका शासनाची – पालकमंत्री जयकुमार गोरे
स्वेरीत विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी
चांगलें शिक्षण, सुविधा मिळतात
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात मुलींना शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले पाहिजे ही भूमिका शासनाची आहे. मराठा समाजातील मुला- मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षणातल्या सगळ्या सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान चांगल्या शिक्षणाबरोबर निवासाची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुला मुलींसाठी वसतीगृहाची व्यवस्था करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
देशाची युवा पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलें शिक्षण आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी स्वेरी ने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. स्वेरीमुळे गोर गरिबांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यार्थी घडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्यशासन नेहमी सहकार्य करेल असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात स्वेरी संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी रोगे म्हणाले, सन १९९८-९९ पहिलंच वर्ष त्यावर्षी या महाविद्यालयाची रूपाली पवार या विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवून पहिली आली होती. ती परंपरा अद्याप चालू आहे. स्वेरी संस्थेची विद्यार्थी संख्या १६० वरून ५५०० विद्यार्थी संख्या, तर ८ शिक्षकावरुन ३३० शिक्षक संख्या झाली. संस्थेचे प्लेसमेंटच्या माध्यमातून ५०० हून अधिक विद्यार्थी नोकरीला लागले आहेत. विकसित देशात संस्थेचे विद्यार्थी नोकरी करीत आहेत. प्रवेश आणि कॅम्पस एवढेच नाही तर संशोधन करण्यालाही प्राधान्य दिलेले आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन यांनी ३३ कोटी ७३ लाख रुपये चा दोन वर्षाच्या रिसर्च प्रोजेक्ट मंजूर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
यावेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधानदादा आवताडे, माढा मतदार संघाचे आमदार अभिजीतआबा पाटील, सांगोला मतदार संघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, विधान परीषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतन सिंह केदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, गोपाळपूरच्या सरपंच सौ.पुष्पा बनसोडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. विकास भोसले व त्यांचे पदाधिकारी, पोलीस उपअधिक्षक आयपीएस प्रशांत डगळे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. डॉ. सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही. एस. शेलार, एन.एस. कागदे, धनंजय सालविठ्ठल, दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, बी.डी.रोंगे, विश्वस्त एन. एम. पाटील, इतर विश्वस्त,कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, अन्य महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी मानले.