नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी संतांना निमंत्रण
ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर,राणा महाराज वासकर,रामकृष्ण महाराज वीर,विठ्ठल महाराज चवरे, नामदास महाराज यांचा समावेश
संपादक – दिनेश खंडेलवाल
नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी संतांना निमंत्रण
ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर,राणा महाराज वासकर,रामकृष्ण महाराज वीर,विठ्ठल महाराज चवरे, नामदास महाराज यांचा समावेश
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरां बरोबर संतमहंत उपस्थित राहणार आहेत.
यामुळे धर्म, अध्यात्म आणि समाज सुधारणा यांचं एक सुंदर मिश्रण पहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पंढरपुरातील ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर, वासकर फडाचे प्रमुख राणा महाराज वासकर, रामकृष्ण महाराज वीर, विठ्ठल महाराज चवरे, नामदास महाराज, चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
५ डिसेंबर रोजी मुंबई येथे शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री व इतर मंत्री शपथ घेणार आहेत. जिथे एकाच ठिकाणी राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकत्र येतील यांच्यासाठी तीन प्रमुख व्यासपीठे तयार केली जात आहेत. हे सर्वंच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरतील.
शपथविधी मध्ये जो प्रारंभ होईल तो केवळ एक राजकीय घटना नाही तर समाज्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा एक गोड टप्पा असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात राजकारण आणि धर्माचा संगम होईल जे संपूर्ण राष्ट्राच्या एकतेची ताकद दाखवेल असे सांगितले जात आहे.