मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे न.पा.च्या दारात उपोषण
मागण्या मान्य करत प्रस्ताव पाठवण्याचे दिले आश्वासन

संपादक-दिनेश खंडेलवाल
मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे न.पा.च्या दारात उपोषण
मागण्या मान्य करत प्रस्ताव पाठवण्याचे दिले आश्वासन
पंढरपूर : येथील मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूर नगर परिषदेच्या दारामध्ये शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले. सदर उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य करत प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जमीर तांबोळी व त्यांचे सहकारी यांनी मुस्लिम समाजासाठी 65 एकर परिसरातील 55 गुंठे जागा ताब्यात देणे बाबत मागणी केली. त्याचबरोबर छोटा व बडा कब्रस्तानच्या भिंतीची उंची वाढविणे व परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी तसेच कब्रस्तानच्या आतील बाजूस दोन खोल्या बांधून देण्याची मागणी केली होती. या सर्व मागण्या पंढरपूर नगर परिषदेने मान्य करत 55 गुंठे जागेसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले. तर छोटा कब्रस्तान येथील खोल्या बांधण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करू अशी ग्वाही दिली.
यावेळी अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजना च्या माध्यमातून कब्रस्तान ईदगाह व समाज मंदिर या ठिकाण चा विकास करण्यासाठी शासनाच्या जीआर प्रमाणे कायमस्वरूपी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली त्याचाही प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन यावेळी दिले.
शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे संस्थापक जमीर तांबोळी सह तालुकाध्यक्ष आदम बागवान, मुबारक आत्तार,पत्रकार रफिक आत्तार, हाजी अकबर शेख, छोटा कब्रस्तान ट्रस्ट सामाजिक परिवर्तन संघटना संस्थापक मसुरे सर, राष्ट्रवादीचे नेते सुभाष भोसले, असिफ तांबोळी, मुजीब सय्यद अरमान तांबोळी,आफताब मनेरी, दिशान तांबोळी, समीर फुलारी,साकिब मनेरी, शाहरुख सय्यद तांबोळी, हाफिज, कारी सोहेल रजा, मुक्तार बागवान तसेच इतर मुस्लिम बांधव व संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.