पंढरपूरात प्रसिद्ध हेअर कट मास्टर जावेद हबीब याच्या प्रतिमेला थुंकून-जोडेमारो आंदोलन
राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपुरातील नाभिक समाज व्यवसायिक राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे शहर अध्यक्ष तुकाराम चव्हाण सह राज्य अध्यक्ष सतीश चव्हाण व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज
प्रसिद्ध हेअर कट डिझायनर जावेद हबीब यांनी एका ठिकाणी हेअर कट करताना पाण्याऐवजी थुंकी चा वापर केल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या व संतप्त नाभिक समाज बांधव व व्यावसायिकांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारो व थुंकून निषेध करत आंदोलन केले.
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुसफ्फरनगर शहरांमध्ये जावेद हबीबने हेअर कटचा सेमिनार आयोजित केला होता त्या सेमिनारमध्ये त्यांनी महिलांचे विविध कट करण्याचे प्रशिक्षण उपस्थित असणाऱ्या महिला भगिनींना व लोकांना विविध हेअर कट शिवताना एक महिलांची हेअर कट करून दाखवताना त्या महिलाच्या केसात पाणी नमारता तीच्या केसात थुंकून हेअर कट केला त्याच्या ह्या कृत्यामुळे नाभिक समाजाची भावना दुखावल्या आहेत तसेच नाभिक समाज हा ग्राहकास दैवत मानतो आज पर्यंत नाभिक समाज हा ग्राहकाची सेवा करण्यात अग्रेसर आहे त्या मुळेच राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंढरपूर शहर राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने जावेद हबीब ह्याच्या प्रतिमेस जोडोमारो व थुंकून आंदोलन करण्यात आले. तसेच निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
राष्ट्रीय नाभिक युवक संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण,राष्ट्रीय नाभिक युवक संघटना महाराष्ट्र राज्य संघटक जितेंद्र भोसले, राष्ट्रीय नाभिक युवक संघटना पंढरपुर शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण, बारा बलुतेदार आलुतेदार अध्यक्ष किशोर भोसले, राष्ट्रीय नाभिक युवक संघटना पंढरपुर शहर कार्याध्यक्ष मनोज गावटे, पंढरपूर शहर दुकान मालक-चालक संघटना चेअरमन पांडुरंग यादव, शिवसेना नेते बाळासाहेब देवकर,युवा नेते महेश माने, सोमनाथ भाऊ खंडागळे, निलेश शिंदे,अभिजीत शेटे, गणेश गायकवाड, प्रमोद लाडगावकर, संतोष माने, सनी कोकाटे, आशिष खंडागळे, निखिल जाधव, सचिन शिंदे, संजय काशीद, कौस्तुभ देवकर, अजय माने, अनुग्रह चव्हाण, सुनील खंडागळे, विजय माने,अंकुश भोसले, अनिल शेटे, गणेश माने, किरण गाडेकर , खंडागळे, हेमंत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक दिनेश खंडेलवाल, पंढरपूर
mail-lokpatranewsppur123@gmail.com