बिझनेस

॥ झाडु संतांचे मार्ग॥ करु पंढरीचा स्वर्ग॥ यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन

स्वच्छ भारत अभियान आषाढी यात्रा 2023

संपादक-दिनेश खंडेलवाल

जाहिरात………. जाहिरात………. जाहिरात

॥ झाडु संतांचे मार्ग॥ करु पंढरीचा स्वर्ग॥ यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन

स्वच्छ भारत अभियान आषाढी यात्रा 2023

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)

पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. या भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणेकरीता खालील सुचनांचे सर्वांनी पालन करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.

1) यात्रेकरु, दिंडीकरी,फडकरी, भाविकभक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे.

2) उघड्यावर शौचास बसु नये प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या

शौचालयाचा वापर करावा.

3) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.

4) पत्रावळी व द्रोणचा वापर :- जेवणाकरीता थर्माकोल, प्लॉस्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याएवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा,द्रोणचा वापर करावा व प्लॉस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा.
5) कचरा व्यवस्थापन :- आपल्या मठ/संस्था इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे

अन्न इ. तीन टिपामध्ये ओला, सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटा

गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा. रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकु नये.

6) नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये, नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी

प्यावे.

7) शिळे अन्न, नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. 8) धोकादायक इमारतीमध्ये राहू नये.

9) पार्कींग व्यवस्था ठिकाणे :- अंबाबाई पटांगण, संत गजानन महाराज मठामागे, इसबावी विसावा मंदिर समोर, सांगोला रोड एम.एस.ई.बी.समोर, कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नग मरिआई पटांगण, कराड रोड वेअर हाऊस जवळ, रेल्वे स्टेशन मैदान, आहिल्या देवी चौक नविन पुलाजवळ, वाखरी पालखी तळ, कुर्डवाडी रोड गणेश ठाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वरील सुचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.


पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
07:26