ईतरसामाजिक

अवकाळी अतिवृष्टीने ऊस तोडणी कामगारांची उपासमार,संसार उघड्यावर,खाण्याची चिंता, यांना आधार कोणी दिला पहा

माऊली हळणवर सह नाम फाऊंडेशनचे ऊस तोडणी कामगारांनी मानले आभार

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : गेल्या चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. महाराष्ट्र राज्यातून ऊस तोडणी मजूर सोलापूर जिल्ह्यातील खेडेगावात उसतोडणी साठी आले होते. दरम्यान अवकाळी पावसाने अन् अतिवृष्टीमुळे ते रहात असलेल्या ठिकाणी कोणताही निवारा नसल्याने अअत्यांचे सर्व अन्नधान्य व साहित्य भिजून गेले होते. लहान मुलांसह सर्वांची उपासमार होत असल्यामुळे हवालदिल झालेल्या ऊस तोडणी मजुरांना काही सुचेना आणि अंधारात दिव्याने प्रकाश करावा तसेच घडले या उसतोड कामगारांना नाम फाउंडेशनचा आधार मिळाला. अन् उपासमारीची चींता मिटली.

पंढरपूर तालुक्यातील अनेक ऊसतोड मजुरांना अन्नधान्य किटचे वाटप करून सर्वतोपरी मदत करण्याचे आव्हान माऊली हळणवर यांनी अनेक संस्थांना आव्हान केले होते याची दखल घेत नाम फाउंडेश ऊसतोड मजुरांना तात्काळ अन्नधान्य पाठवून देऊन त्यांच्या झोपडीपर्यंत मदत पोचवण्याचे काम नाम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नाम फाउंडेशन चे सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली हळणवर यांनी नामचे राज्य समन्वयक गणेश दादा थोरात यांच्याकडे सदर प्रकाराची माहिती दिली होती. त्यांनी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तारणहार सिनेअभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याशी चर्चा करून अन्नधान्याचे किट माऊली हळणवर यांच्याकडे सुपूर्द केले. माऊली हळणवर स्वतः उसाच्या फडांमध्ये जाऊन तालुक्यातील विविध भागांमध्ये या किटचे वाटप करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज तारापुर, सुस्ते,नारायण चिंचोली, देगाव, ईश्वर वठार, अजनसोड,बिटरगाव या गावात जाऊन ऊस तोडणी कामगारांच्या पालावर नेऊन कामगारांना नाम फाउंडेशन यांचे वतिने अन्नधान्याचे किट पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक लक्ष्मण धनवडे, नाम फाउंडेशन चे राज्य समन्वयक माऊली हळणवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी पांडुरंग चे नूतन संचालक किसन सरवदे ,पंकज देवकते अनिल घाडगे,दत्ता बोबडे, संभाजी चव्हाण,पोपट डुबल,पांडुरंग कारखान्याचे शेती विभागाचे राहुल नागणे,विष्णू माने, पोपट पाटील, ज्ञानेश्वर बर्डे, संजय चौगुले ,माऊली गुंडगे,सुरज खरात, नागेश काळे, सचिन घाडगे, चिटबाय राजू लेंगरे,भारत गोडगे परमेश्वर डुबल,मोहसीन शेख,धनाजी,किसन सरवदे आदी सह नाम फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. माऊली हळणवर सह नाम फाऊंडेशनचे ऊस तोडणी कामगारांनी आभार मानले.

बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close