
संपादक – दिनेश खंडेलवाल
नरविर शिवाजी काशीद यांचे स्मारक पंढरपुरात होणार – आ. आवताडे
शिवरक्षक नरविर शिवाजी काशिद यांची ३६५ वी पुण्यतिथी संपन्न
पंढरपूर(प्रतिनिधी):- सकल नाभिक समाजाच्या वतीने पंढरपुरात नरवीर शिवाजी काशीद पुण्यतिथी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी नरवीर शिवाजी काशीद यांचे स्मारक लवकरात लवकर पंढरपूर मध्ये उभारू असे आश्वासन दिले.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सिध्दी जोहारच्या पन्हाळगड वेढ्यातून सुखरूप सुटका व्हावी म्हणून स्वामीनिष्ठ शिवबा काशिद हे प्रति शिवाजी महाराज बनून सिध्दी जोहारच्या छावणीत भेटायला गेले. तेथे ते उघडकीस आल्यामुळे त्यांचा शिरच्छेद झाला. हिंदवी स्वराज्य व छत्रपती शिवाजी महाराज यांचेसाठी बलिदान केले. अशा स्वामिनिष्ठ शिवरक्षक शुरविर शिवबा काशिद यांची ३६५ वी पुण्यातिथी बलिदान दिना निमित्त सकल नाभिक समाज पंढरपूर शहर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
श्री.संत सेना महाराज मठ येथे पंढरपूर शहर सकल नाभिक समाजाच्या वतीने हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद यांच्या बलिदान दिना निमित्त पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे, वैद्यकीय क्षेत्रातील नावलौकिक असलेले डॉ.बि.के धोत्रे व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत घुगरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मुर्तीचे पुजन करण्यात आले.
त्याप्रसंगी त्याग, निष्ठा आणि शौर्याचं अजरामर प्रतीक असलेला हा मावळा इतिहासात सदैव अढळ राहील. हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद यांचे स्मारक पंढरपूर शहरात कश्या प्रकारे व लवकरात लवकर कसे होईल ह्यासाठी मी प्रयत्नशिल राहील अशी वंदनीय भावना आमदार आवताडे यांनी यावेळी व्यक्त केली.
त्याप्रसंगी पंढरपूर नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक डाॅ.अशोक माने, ज्ञानेश्वर चौधरी,बबन शेटे, तसेच सकल नाभिक समाजाचे सतीश चव्हाण,साईनाथ शिंदे,तुकाराम चव्हाण, मनोज गावटे,पुरुषोत्तम राऊत,अनिल शेटे,अविनाश शेटे,अनिल सप्ताळ, सोमनाथ चिखले,परमेश्वर डांगे,पांडुरंग शिंदे,सोमनाथ खंडागळे,राकेश देवकर, युवराज हडपद,महेश माने,जिंतेद्र भोसले, बाळासाहेब देवकर, विठ्ठल भोसले,प्रविण शेटे, आदिनाथ शेटे,हर्षद शेटे,शिवतेज डांगे,सार्थक चव्हाण,अनुग्रह चव्हाण, अभिषेक चव्हाण,आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश चव्हाण, साईनाथ शिंदे, तुकाराम चव्हाण, मनोज गावटे यांनी मोलाचे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.