पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी समारोप समारंभ
रविवार दि. १० जुलै २०२२ सकाळी ११ वाजता पंचायत समिती पंढरपूर
संपादक-दिनेश खंडेलवाल
जाहिरात
पंंढरपूर:-महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा स्वच्छता आणी ग्रामविकास विभाग यांचे वतिने श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी समारोप आषाढी एकादशी रविवार दि.१०जुलै२०२२रोजी सकाळी ११वाजता पंचायत समिती पंढरपुर येथे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे याचे हस्ते होणार आहे.या प्रसंगी खा.डाँ. जयसिध्देश्वर महास्वामी,खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर,आ.रणजीतसिंह मोहीते पाटील आ.सुभाष देशमुख, आ.कु.प्रणितीताई शिंदे,आ.संजय मामा शिंदे,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.अरूण लाड,आ.बबनराव शिंदे,आ.शहाजीबापू पाटील,आ.यशवंत माने,आ.राम सातपुते, आ.जयंत आसगावकर,आ.विजय देशमुख, आ.राजेंद्र राऊत,आ.समाधान आवताडेअभय महाजन(सहसचिव,,पाणी पुरवठा स्वच्छता विभाग)सौरभ राव विभागीय आयुक्त पुणे आदी मान्यवर उपस्थीत रहाणार आहेत. याप्रसंगी वारकरी व नागरीकांनी उपस्थीत रहावे असे आवहान मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर, दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, रविंद्र शिंदे संचालक जल जीवन मिशन,रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) यांनी आवहान केले आहे.
स्वच्छता दिंडी समरोप समारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे हस्ते १० जुलै रोजी होणार आहे.