
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत निमित्त श्री सर्वजन हितैषी ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फाराळ वाटप
साबुदाणा खिचडी केळी शेंगदाणा लाडू, पिण्याचे शुद्धपाणी वाटप करण्यात आले
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात अशा भाविक वारकऱ्यांना कोलकत्ता येथील श्री सर्वजण हितैषी ट्रस्टच्या वतीने लक्ष्मणबाग येथे मोफत फराळाचे वाटप करण्यात येते.
जगद्गुरु रामानुजाचार्य श्री झालरिया पिठाधिपती श्री श्री १००८ श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून गेल्या सात ते आठ वर्षांपासून पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आषाढी यात्रेतील हजारो भाविक, वारकऱ्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येत असते.
याचे आयोजन लक्ष्मण बाग येथील व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यंदाही मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, शेंगदाणा लाडू, केळी तसेच शुद्ध पिण्याची बाटली, खजूर असे संपूर्ण फराळाचे वाटप करण्यात येते. या वाटपाचे नियोजन व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यावर्षी वाटप करण्यासाठी राधेश्यामजी शर्मा व नागपूर येथील ओमप्रकाश सरोदे यांनी सहकार्य केले तर सदर फराळ वाटपा मध्ये जगदीश टाक,प्रमोद शेंडे,प्रताप परिहार,मोहन भोईर, राजेश देशमुख, रामचंद्र पाटील, प्रदिप सुरवसे,राजराजेश्वरी रेखाताई टाक, विलास खंकाळ, गोविंद कदम तसेच सरोदे परिवार यांचे मोलाचे योगदान लाभले.
देवशयनी एकादशी निमित्त यंदाही आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या महिला,पुरुष व जेष्ठ वारकरी भाविकांना फराळ वाटप केल्यानंतर त्यांनी श्री सर्वजण हितैषी ट्रस्टचे मनापासून आभार मानले तसेच फराळ वाटप करताना राम कृष्ण हरी,जय हरीच्या गजरात वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मनापासून धन्यवाद दिले.